उरुळी कांचन, (पुणे) : सोरतापवाडी (ता. हवेली) येथील पुरोगामी शिक्षण प्रसारक मंडळाचे पुरोगामी माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 97.48 टक्के लागल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य मच्छिंद्र जाधव यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज सोमवारी (ता. 27) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. महात्मा गांधी विद्यालयातील 159 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील 155 विद्यार्थी पास झाले आहेत.
प्रथम पाच आलेले विद्यार्थी
प्रथम संस्कृती दिलीप कुंजीर, 95 टक्के,
व्दितीय अवंतिका संजय चौधरी 93.40,
तृतीय प्रांजल नवनाथ चौधरी 88.60 टक्के,
चतुर्थ दिशा दिलीप कुंजीर 88 टक्के,
पाचवा सिद्धेश्वर ज्ञानेश्वर चंद 86 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
दरम्यान, विशेष प्राविण्यासह 23, प्रथम श्रेणी 57, द्वितीय श्रेणी 62, तृतीय श्रेणी 13 उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ चोरघे, उपाध्यक्ष रामदास चौधरी, सचिव रंगनाथ कड व संस्थेतील सर्व विश्वस्तांनी व मुख्याध्यापक एम. डी. जाधव व पर्यवेक्षक चव्हाण आर. एम यांनी अभिनंदन केले.