लहू चव्हाण
पाचगणी, (सातारा) : एन.एम.एम.एस. (नॅशनल मिन्स- कम मेरिट स्कॉलरशीप) परीक्षेत पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील भारती विद्यापीठ हायस्कूलच्या प्रतिक्षा मालुसरे व अभिषेक लादे या विद्यार्थ्यांनी या परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद कोल्हापूर यांच्या मार्फत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी हि शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. तिचा निकाल नुकताच काहीर झाला आहे. तसेच हि परीक्षा भारत सरकार तर्फे आयोजित केली जाते. या परीक्षेत जे विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरतात त्यांना वर्षाला १२ हजार रुपये प्रमाणे चार वर्षात ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. यामध्ये सर्व प्रवर्गातील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रक्कम दिली जाते.
दरम्यान, या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक शहाजी सावंत व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे भारती विद्यापीठ शालेय शिक्षण विभागाच्या अध्यक्षा विजयमाला कदम, सहकार्यवाहक आमदार बाळासाहेब कदम, अरुंधती निकम, एम.डी कदम यांनी अभिनंदन केले.