लहू चव्हाण
पाचगणी : विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती दूर करून, तणाव मुक्त वातावरणात परीक्षा देता यावी याकरिता पाचगणितील शाळांना एकत्र आणण्याची किमया ‘परीक्षा योद्धा’ने घडवली. ‘परीक्षा पे चर्चा’ या स्पर्धेतून चांगले चित्रकार निर्माण होतील, असे प्रतिपादन महाबळेश्वर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनी केले.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, ‘परीक्षा पे चर्चा’ हा उपक्रम महाबळेश्वर तालुक्यातील तीन केंद्रावर आयोजित केला होता. यातील चित्रकला स्पर्धेत १५६४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचा बक्षीस वितरण पाचगणी येथील संजीवन विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते .त्या वेळी गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे बोलत होते.
यावेळी हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका तेजस्विनी भिलारे, संजीवन विद्यालयाचे मुख्याध्यापक धनंजय शिरूर, देशमुख सर, क्लोरेस्ट डिसुझा, हिलरेंज हायस्कूलचे मुख्याध्यापक जतीन भिलारे, न्यू इरा हायस्कुलचे मुख्याध्यापक शिवाजी शिंदे, हिलरेंज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश बेलोशे, चेतन दत्ताजी हायस्कूल मेंटगुताडचे मुख्याध्यापक शिवाजी निकम, बिलीमोरिया हायस्कुलचे मुख्याध्यापक विशाल कानडे, भारती विद्यापीठ गाॅड्स व्हॅली इंटरनॅशनल हायस्कूलचे प्राचार्य कुमारराव रेपाका आदी मान्यवर उपस्थित होते.
या चित्रकला स्पर्धेत संजीवन विद्यालयाच्या प्राची धार (प्रथम क्रमांक) ,सम्राट तेलंग (द्वितीय क्रमांक) , अंजुमन हायस्कूल हायस्कूलच्या फातिमा पटेल हिने तृतीय क्रमांक मिळविला.
तसेच सई घुले, वीर सराफ (सेंट पिटर्स हायस्कूल) , नेत्रा कलानी ( न्यू इरा हायस्कूल), ओमकार यादव (हिलरेंज माध्यमिक भिलार), सिद्धी चिकणे ( एमइएस इंग्लिश मीडियम स्कुल महाबळेश्वर), मंजू मानकर (नचिकेता हायस्कूल), श्रुती कांबळे (कांताबेन मेहता ज्युनिअर कॉलेज ), रेश्मा जाधव (मालिकार्जुन विद्यालय वाघावळे), कुणाल सपकाळ ( भैरवनाथ विद्यालय), साक्षी बोरणे ( गिरीस्थान प्रशाला महाबळेश्वर) या दहा स्पर्धकांना उत्कृष्ट विजेते म्हणून घोषित करण्यात आले. तर इतर पंचवीस विद्यार्थ्यांना सन्मान चिन्हे आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी संताजी बिरामणे, शांताराम जाधव, श्रीकांत पोफळे यांसह तालुक्यातील कलाशिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक श्रीनिधी जोशी यांनी, स्वागत प्रकाश बेलोशे यांनी, सूत्रसंचालन अमृता पोरे यांनी तर आभार आकांशा बोंगाळे यांनी मानले.