Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एमआयटीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व तत्वज्ञ संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्याचे ३० जानेवारी रोजी अनावरण ; महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 28 January 2023, 17:29

पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी आर्ट, डिझाइन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७५व्या पुण्यतिथी निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांच्या भव्य पुतळ्यांची स्थापना व अनावरण करण्यात येणार आहे. हा समारंभ सोमवारी (ता. ३०) रोजी १०.३० वाजता जगातील सर्वात मोठा विश्वशांती घुमट म्हणजेच तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज व संत श्री तुकाराम महाराज प्रार्थना सभागृह, विश्वराजबाग, लोणी काळभोर, पुणे येथे संपन्न होणार आहे.

या समारंभाला राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच सिक्कीमचे माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील हे अध्यक्षस्थानी असतील.

त्याच प्रमाणे माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. विजय कुमार चौबे, राष्ट्रसंत तुकडोेजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष आर. चौधरी, आणि अमरावती येथील अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवामंडळ गुरूकुंज आश्रमचे सरचिटणीस जनार्दन बोथे, थोर विचारवंत प्रा. रतनलाल सोनाग्रा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारेचे अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक, ग्रामगीताचार्य, गुरूकुंज आश्रमचे अरविंद राठोड व नागपूर येथील कृषितज्ञ प्रा. डॉ. रमेश ठाकरे, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड व एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

अनावरण कार्यक्रमानंतर राष्ट्रसंतांच्या रचनांवर आधारित खंजिरी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम श्री गुरूदेव सेवामंडळाचे प्रा. सुरेंद्र नावडे यांच्या मार्गदर्शनात होणार आहे. अशी माहिती नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व विश्वशांती केंद्र आळंदी चे सल्लागार डॉ. एस.एन.पठाण यांनी दिली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

एसटीच्या ५० फेऱ्या रद्द! मुंबई-पुणे प्रवाशांची गैरसोय; मार्ग सुरक्षित होईपर्यंत प्रवास टाळण्याचे आवाहन

Monday, 6 July 2026, 18:03

भोर महाड रस्त्याने कोकणात जाताय? सावधान! भोर महाड रस्त्यावर दरडी कोसळल्याने पर्यटक अडकले, दरडी हटवण्याचे काम सुरू

Monday, 6 July 2026, 17:34

बिघाडग्रस्त ट्रकवर दुचाकी आदळल्याने डिकसळ येथील युवकाचा जागीच मृत्यू..

Monday, 6 July 2026, 17:19

“अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

Monday, 6 July 2026, 16:56

रांजणगाव एमआयडीसीत दादागिरीला नाही थारा! उद्योगांच्या सुरक्षेसाठी पोलीस-उद्योग समन्वय बैठक, खंडणीखोर व महिला छेडछाड करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

Monday, 6 July 2026, 16:51

दौंडच्या विकासाला गती! पाटसमध्ये बाजार समितीसाठी १० एकर जागा मंजूर; आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश

Monday, 6 July 2026, 16:21
Next Post

'परीक्षा पे चर्चा या स्पर्धेतून चित्रकार निर्माण होतील' : महाबळेश्वर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी -आनंद पळसे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.