लहू चव्हाण..
Pachgani News : (सातारा) नगरपरिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी जीवनाचा आनंद घेत शिक्षणातून आपली प्रगती करावी. पालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती पाहिजे तितकी सक्षम नसते. अशा विद्यार्थ्यांना रोटरी क्लबने दिलेला मदतीचा हात कौतुकास्पद आहे. असे गौरवोद्गार पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी काढले.(Pachgani News)
विद्यार्थ्यांनी जीवनाचा आनंद घेत शिक्षणातून आपली प्रगती करावी.
पाचगणी नगरपालिका शाळा क्रमांक २ येथे नगरपरिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ मुंबई सेंट्रल आणि रोटरी क्लब ऑफ पंचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रेनकोट वाटप प्रसंगी कऱ्हाडकर बोलत होत्या.(Pachgani News)
यावेळी वाई किसनवीर कॉलेजचे माजी प्राचार्य जयवंत चौधरी, पाचगणी रोटरी क्लबचे अध्यक्ष स्वप्निल परदेशी, सेक्रेटरी नितीन कासुर्डे, रोटरीयन राजेंद्र भगत, विनिता सक्सेना, अविनाश माने, किरण पवार आदी मान्यवर उपस्थित होते.(Pachgani News)
यापुढे बोलताना कऱ्हाडकर पुढे म्हणाल्या, “आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित न राहता विद्यार्थ्यांनी शिक्षणातून आपले भविष्य उज्ज्वल करावे.(Pachgani News)
पाचगणी रोटरी क्लबचे अध्यक्ष स्वप्निल परदेशी म्हणाले, “पाचगणी व परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असते. पावसामुळे गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीमध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रोटरी क्लबच्या वतीने दोनशे विद्यार्थ्यांना रेनकोटचे मोफत वाटप करण्यात आले.”