दीपक खिलारे
इंदापूर : मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वडिलांकडून जिल्हा परिषद मराठी शाळेस ध्वनिक्षेपक संच भेट देऊन जन्मदिवस साजरा केला.
शिवचैतन्य आध्यात्मिक अनुभूती केंद्राचे संस्थापक,अध्यक्ष शिवाजी सूळ महाराज यांनी आपल्या मुलीच्या जन्मदिनाचे औचित्य साधून तरंगवाडी (ता. इंदापूर) येथील बुनगेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस ध्वनिक्षेपक संच भेट देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक किरण जौंजाळ यांनी केले तर आभार दिलीप अभंग यांनी मानले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश कदम, सदस्य अनिल भोंग, महादेव भोंग, दीपक तरंगे, संदीप भोंग, सचिन भोंग, राहुल मारकड व इतर मान्यवर उपस्थित होते.