विशाल कदम
लोणी काळभोर : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल 147 व्या जयंतीनिमित्त लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी एडीटी विद्यापीठात राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला.
विद्यापीठात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त एमआयटीतील एमआयटी महाराष्ट् अकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन ॲण्ड ट्रेनिंग (मॅनेट)च्या विद्यार्थ्यांनी डीजी सिपिंगच्या निर्देशनानुसार परेड करत सरदार पटेल यांना मानवंदना दिली. यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत मानवंदना केली.
डॉ. अनंत चक्रदेव म्हणाले की, आपली एकता हीच आपली ओळख आहे, म्हणूनच आपला देश महान आहे. न्याय, स्वातंत्र्य आणि एकता हीच भारताची ताकद आहे, अशी शिकवण सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतीयांना दिली. त्यांनी स्वातंत्र्यानंतर भारतातील 563 संस्थानांचे विलीनीकरण करण्यासाठी ज्या प्रकारे काम केले आणि भारताची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी केलेल्या अखंड कार्यामुळे त्यांना भारताचे लोहपुरुष म्हटले जाते.
डॉ. रामचंद्र पुजेरी म्हणाले, की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी संपूर्ण देशाला एकात्मतेच्या धाग्यात बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच वल्लभभाई पटेल यांची जयंती देशात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. सरदार पटेल हे स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्रीही होते. भिन्न भाषा, भिन्न वेशभूषा, असा एक भारत हा आपला देश आहे, असे निर्णायक व्यक्तिमत्त्व हे सरदार पटेल यांचे होते.
यावेळी विद्यार्थी विभागाचे प्रमुख रामचंद्र पुजेरी, डॉ. मिलिंद ढोबळे, डॉ. नचिकेत ठाकूर, डॉ. ज्ञानदेव निलवर्ण, डॉ. मोहित दुबे, डॉ. अमित त्यागी, डॉ. रजनीश कौर बेदी, डॉ. अश्विनी पेठे, डॉ. रेणू व्यास, डॉ. अंजली भोईटे, डॉ. अतुल पाटील आदी उपस्थित होते.