अरुण भोई
राजेगाव, ता.१६ : ‘‘भारत देशाची जगात सर्वात मोठी असलेली लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त जागरूक नागरिकांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने निवडणूक आयोगाच्या वतीने नवीन मतदार नाव नोंदणी व मतदार जनजागृती संबंधी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. याचा लाभ घेऊन १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येकाने मतदार नाव नोंदणी करावी,’’असे आवाहन रावणगावचे मंडळ अधिकारी एम. आर. भोई यांनी केले.
भिगवण (ता.इंदापूर) येथील दत्ताकला शिक्षण संस्थेत नवीन मतदार नाव नोंदणी व मतदार जनजागृती अभियान सुरु करण्यात आले आहे. यावेळी बोलताना वरील आवाहन भोई यांनी केले. यावेळी प्राचार्य साळुखे, तलाठी जयंत भोसले, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
दरम्यान, नवीन मतदार नाव नोंदणी व मतदार जनजागृती संबंधी विशेष अभियान राबविण्यात आले होते. या वेळी मतदार नोंदणीचे महत्त्व, नोंदणीची पद्धत, नोंदणीचे विविध फॉर्म याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.