Nagar News : अहमदनगर जिद्द, मेहनत व कोणतेही काम करण्याची तयारी हे गुण यशप्राप्तीसाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे कोणतेही काम छोटे वा मोठे न समजता कष्ट घेऊन शिक्षण घेतले पाहिजे, असे प्रतिपादन कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले.(Nagar News)
काम छोटे वा मोठे न समजता कष्ट घेऊन शिक्षण घेतले पाहिजे
नगर येथील भाऊ बाळाजी जाधव समता विकास मंडळ संचलित उद्धव अकॅडमीत “विद्यार्थी पदाधिकारी नेमणुक” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधून विद्यार्थी पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली. या कार्याक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यादव बोलत होते.(Nagar News)
कोणतेही काम छोटे अगर मोठे समजून लाजू नये. मिळेल ते काम करून अभ्यास करावा. त्यासोबतच आपले आई-वडील शिक्षक थोर मंडळींचा मानसन्मान ठेवावा. त्यासोबतच, कुठेही काही अनुचित प्रकार घडल्यास कुणालाही न घाबरता त्याची माहिती आपल्या आई-वडिलांना किंवा पोलिसांना द्यावी, असे पोलीस निरीक्षक यादव यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी प्राचार्या निशिता जाधव, जयंत जाधव, अनिल दारकुडे आणि इतर शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांची उपस्थिती होती.(Nagar News)
यापुढे बोलताना यादव म्हणाले, “मुलींना घराचे जवळपास ओळखीच्या तसेच अनोळखी लोकांकडून त्रास होतो, प्रवासामध्ये तसेच शाळेच्या येण्या-जाण्याचा मार्गावर कोणीही कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास, विनयभंगाचा प्रकार घडल्यास तात्काळ कोतवाली पोलिसांची संपर्क साधावा आपले नाव गोपनीय ठेवून ठेवून कारवाई करण्यात येईल असे आश्वासित करण्यात आले.”