लोणी काळभोर (पुणे) : एमआयडी आर्ट, डिझाईन आणि टेक्नालॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, लोणी काळभोर (ता. हवेली) यांच्यातर्फे आयोजित पाचव्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन विश्वानाथ स्पोर्टस् मीट २०२३ च्या क्रीडा स्पर्धांमध्ये एमआयटी – एडीटी विद्यापीठीतील एमआयटी स्कूल ऑफ इंजीनिअरिंग संघाने सर्वाधिक ६ सुवर्ण आणि ५ रौप्य पदक जिंकत सर्वसाधारण जेतेपदासह अव्वल स्थान पटाकावले.
या स्पर्धेत एस पी कॉलेज संघाने ५ सुवर्ण आणि ३ रौप्य पदकासह दुसरे, तर एमआयटी डब्ल्युपीयु कोथरूड संघाने ४ सुवर्ण आणि ६ रौप्य पदकासह तिसरा क्रमांकांचे बक्षिस मिळाले. एमआयटी मॅनेट संघाने ४ सुवर्ण ५ रौप्य पदक जिंकत चौथा क्रमांक मिळवला.
राज्यस्तरीय पाचव्या आंतरमहाविद्यालयीन विश्वनाथ स्पोर्टस् मीट २०२३ च्या सर्वसाधारण विजेत्यांसह सर्व १४ खेळ प्रकारातील वैयक्तिक व सांघिक खेळ प्रकारातील विजेत्यांना सुवर्ण पदक, रौप्य पदक आणि ट्रॉफी देऊन प्रमुख पाहुणे टेरीचे संचालक डॉ. राजेंद्र शेंडे, रोईंग खेळाडू अर्जून पुरस्कार विजेता दत्तु भोकनाळ, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू डॉ. मंगेश कराड यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी अक्सिस बँकेचे ऋषी दिक्षित आणि सत्या प्रकाश, बॅक ऑफ इंडियाचे शिबा बिसवाल आणि अभिजित हत्तीमारे, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, विश्वनाथ स्पोर्टस् मीट २०२३ च्या नियोजन समितीचे अध्यक्ष डॉ. रामचंद्र पुजेरी, विद्यापीठाचे क्रीडा संचालक प्रा. पद्माकर फड, डॉ.सुदर्शन सानप आदी उपस्थित होते.
पुरस्कार वितरण समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करताना दत्तु भोकनाळ म्हणाले खेळाडूंच्या स्वप्नांना पंख देण्याचे काम एमआयटी एडीटी विद्यापीठ करत आहे. खेळाडूंना प्रोत्साहन आणि सगळ्या सुविधा देत असल्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडत आहे. खेळाडूंनी अंहकार करू नये. यंदाच्या पाचव्या राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन विश्वनाथ स्पोर्टस् मीट २०२३ मध्ये राज्यभरातील १३० शैक्षणिक संस्थांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा अत्यंत उर्जा देणाऱ्या आणि खेळीमेळीच्या वातारवरणात पार पडल्या. विद्यापीठातर्फे खेळाच्या माध्यमातून नवी पिढी घडविण्याचे काम आम्ही करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रा. डॉ. कराड म्हणाले की, देशातील खेळाडूनी ऑलिम्पिक खेळाकडे पाहिले पाहिजे. दिवसातील काही तास मैदानावर घालवले, तर शारीरिक क्क्षमता वाढण्यास मदत होईल. निष्ठा, श्रद्धा आणि सदभवनेतून स्वत:ला घडविले पाहिजे. एमआयटी एडीटी विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देते. एमआयटी एडीटी विद्यापीठाने विश्वनाथ स्पोर्टस् मीट ही स्पर्धा आयोजित करून खेळाला उच्चस्तरावर नेले. जगाला दिशा देण्याचे काम खेळाच्या माध्यमातून होऊ शकते. भविष्यात चारित्र्यवान आणि मजबूत युवा पिढी घडविण्याचे काम या माध्यमातून होत आहे. देश ज्ञान आणि खेळामध्ये पुढे जावा हा उद्देश या स्पर्धांचा आहे. व्यक्तिमत्व विकासासाठी स्पर्धात्मक खेळाला खूप महत्व असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.