Pune News लोणी काळभोर, ता.०२ : आपल्या सर्वोत्तम शैक्षणिक कार्यासह सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा जतनालादेखील महत्व देणाऱ्या एमआयटी-एडीटीच्या वतीने वारीच्या मार्गाला हिरवाईने नटवण्यासाठी आळंदी ते पंढरपूर या संपूर्ण मार्गावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा संकल्प करण्यात आला होता. (Pune News) या अनोख्या उपक्रमाची सुरवात बुधवारी (ता.२) करण्यात आली. तसेच वडकी नाका (सासवड) येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. (Pune News)
या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट आणि आयसीटीच्या संचालिका डॉ. सुनिता मंगेश कराड उपस्थित होत्या. याशिवाय क्रॉयन्स ऑटोमोटिव्हच्या वरिष्ठ सल्लागार कपिला सोनी, ग्रीन सोसायटी ऑफ इंडिया च्या संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आशा राऊत, संस्थापक रूटस्किल तथा पर्यावरणवादी कार्यकर्त्या भावीषा बुद्धदेव , कुलसचिव डॉ. महेश चोपडे, कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक तथा स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. अतुल पाटील यांच्यासह सर्व डीन, संचालक, संस्थांचे प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सदस्य आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचे विद्यार्थी उपस्थित होते. (Pune News)
पंढरीची वारी म्हटली की, आपल्या डोळ्यासमोर येते महाराष्ट्राची शतकानुशतकांची एक महान सांस्कृतिक परंपरा. प्रति वर्षी लाखो भाविक विठुनामाचा व ज्ञानोबा-माऊलीचा गजर करीत व आधी भगवी पताका घेऊन पंढरीत दाखल होतात. यात पुण्यातून देहू व आळंदी येथून दरवर्षी ही वारी निघते. या वारीच्या दरम्यान वारकऱ्यांना ठिकठिकाणी विसावा घ्यावा लागतो. अशा स्थितीत वारकऱ्यांना निवांतपणे थांबता यावे, यासाठी आळंदी ते पंढरपूर या मार्गावर हे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
एमआयटी-एडीटीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला हार्टफुलनेस संस्था, रूट स्किल प्रा. लिमिटेड विविध एनजीओ क्रेडाई या विविध संस्थांकडून योग्य ते सहकार्य लाभत आहे. माईर्स एमआइटीचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून व एमआयटी-एडीटीचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश टी. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला सुरवात करण्यात आली आहे. (Pune News)
पालखी मार्ग बनवणार ग्रीन कॉरिडोर : डॉ. सुनीता कराड
वृक्षारोपण मोहिमेचे उद्दिष्ट पालखी मार्गावर हरित आणि अधिक शाश्वत वातावरण निर्माण करणे हा आहे. केवळ झाडे लावणे हा उद्देश नसून झाडांचे संगोपन ही आपली जबाबदारी असून पालखी मार्गावरील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांच्यावर संगोपनाची जबाबदारी देण्याचा प्रयत्न एमआयटी एडीटी विद्यापीठानकडून केला जाणार आहे.
पालखी मार्गावर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी लोकसहभाग वाढेल यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांचा सहभाग तसेच किर्तन, अभंगाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यावर भर देण्यात आला आहे. संपूर्ण पालखी मार्ग हा आम्ही ग्रीन कॉरिडोर बनवणार आहोत, जेणेकरून वारकऱ्यांसाठी वारीचा अनुभव अत्यंत सुखद असेल. असे डॉ. सुनीता कराड यांनी सांगितले आहे.