पुणे : एमआयटी आर्ट, डिजाइन आणि टेक्नोलॉजी विद्यापीठ लोणी काळभोर, पुणे येथील एमआयटी स्कूल ऑफ़ इंजीनियरिंगचे प्रा. डॉ. राजेश बाळकृष्ण जाधव यांचा एकेएस (AKS) एज्युकेशन अवॉर्ड यांच्यातर्फे गुरगाव, दिल्ली येथील ग्रँड हयात हॉटेल येथे नुकत्याच झालेल्या जागतिक स्तरावरील पुरस्कार सोहळ्यात, ग्लोबल टीचर अवॉर्ड राष्ट्राच्या उभारणीतील सर्वोत्कृष्ट टीचर पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
डॉ. राजेश जाधव यांनी कोरोना काळात विकसित केलेल्या ऑक्सिजन प्लांटमुळे ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यास मदत झाली होती. या कामाचे त्यांनी पेटंट मिळवले आहे. ग्लोबल टीचर अवॉर्डसाठी 110 पेक्षा जास्त देशांमधून शिक्षकांनी सहभाग घेतला होता, यात भारतातील निवडक शिक्षकांमधून डॉ. राजेश जाधव यांची निवड झाली. त्यांनी शिक्षण, संशोधन आणि सामाजीक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना गौरविण्यात आले.
या यशाबद्दल एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे डीन, डायरेक्टर, हेड ऑफ डिपार्टमेंट, सर्व सहकारी आणि समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी डॉ. राजेश जाधव यांचे अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.