पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्यकडून MHT CET or Common Entrance Test 2022 साठी अॅडमीट कार्ड्स अर्थात हॉल तिकीट जारी करण्यात आले आहेत.
MHT CET 2022 Exams यंदा 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान घेतली जाणार आहे. यामध्ये एलएलबी (3 वर्ष कोर्स), एलएलबी (5 वर्ष कोर्स) आणि पीसीएम, पीसीबी ग्रुप च्या सीईटी परीक्षा होणार आहेत. MHT CET 2022 PCM ग्रुपची परीक्षा 5-11 ऑगस्ट मध्ये होणार तर पीसीबी ग्रुप ची परीक्षा 12 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. विद्यार्थी आपली हॉल तिकीट्स cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईट वरून डाऊनलोड करू शकतात.
विद्यार्थ्यांना MHT CET 2022 परीक्षा साठी 9 ते 12 च्या शिफ्ट साठी 7.30 वाजता परीक्षा केंद्रावर पोहचणं आवश्यक आहे. तर 2 ते 5 च्या शिफ्टसाठी 12.30 पर्यंत पोहचणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना हॉल तिकीट घेऊन जाणं आवश्यक आहे. फक्त पाण्याची बाटली आणि स्टेशनरी घेऊन जाण्याची परवानगी आहे.
MHT CET admit card 2022 कसे कराल डाऊनलोड?
mhtcet2022.mahacet.org या वेबसाईटला भेट द्या.
सर्च करून MHT CET admission card लिंक वर क्लिक करा.
आता candidate portal वर लॉगिन करा. तुमचा अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड त्यासाठी आवश्यक आहे.
MHT CET 2022 admit card तुम्हांला आता स्क्रीनवर दिसेल.
MHT CET 2022 hall ticket वरील तपशील नीट तपासून आता ते डाऊनलोड करून ठेवू शकता. त्याची प्रिंट देखील काढू शकता.