जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) कडून प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 541 पदांची भरती करण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जुलै 2025 आहे. इच्छुक उमेदवारांनी http://www.sbi.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन किंवा थेट https://ibpsonline.ibps.in/sbipomay25/ या नोंदणी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येईल.

एकूण जागा किती?
या भरतीअंतर्गत एकूण 541 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये 500 पदे नियमित स्वरूपात असून, उर्वरित 41 पदे मागील भरतीमधील अनुशेष (रिक्त) पदे आहेत.
शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी (Graduate Degree) घेतलेली असावी. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही काही अटींच्या अधीन राहून अर्ज करता येईल.
वयोमर्यादा
अर्जदाराचे वय 14 जुलै 2025 या तारखेपर्यंत किमान 21 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
अर्ज शुल्क किती?
सामान्य, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 750 रुपये आहे. अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि दिव्यांग (पीडब्ल्यूडी) प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क माफ करण्यात आले आहे. शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाईल.
ही भरती संधी केवळ बँकिंग क्षेत्रातच नव्हे तर सरकारी सेवेमध्ये स्थिर आणि प्रतिष्ठेची नोकरी मिळविण्याचा उत्तम पर्याय ठरू शकते. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यास विलंब न करता लवकरात लवकर फॉर्म भरावा.







