मुंबई : राष्ट्रीय महामार्ग वापरणाऱ्या दुचाकी वाहनांना येत्या १५ जुलैपासून टोल द्यावा लागणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून पसरत आहेत. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून दुचाकीस्वारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याचदरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे एक ट्विट समोर आले आहे. ज्यामुळे दुचाकीस्वारांना आता दिलासा मिळाला आहे.

नितीन गडकरी यांनी दुचाकीस्वारांना टोल द्यावा लागणार असल्याच्या दाव्याचे स्पष्टपणे खंडन केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर आणि अधिकृत निवेदनाद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी दुचाकीस्वारांनी टोल द्यायचा की नाही याबाबत स्पष्टपणे सांगितले आहे.

📢 महत्वपूर्ण
कुछ मीडिया हाऊसेस द्वारा दो-पहिया (Two wheeler) वाहनों पर टोल टैक्स लगाए जाने की भ्रामक खबरें फैलाई जा रही है। ऐसा कोई निर्णय प्रस्तावित नहीं हैं। दो-पहिया वाहन के टोल पर पूरी तरह से छूट जारी रहेगी। बिना सच्चाई जाने भ्रामक खबरें फैलाकर सनसनी निर्माण करना स्वस्थ…
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 26, 2025
काय आहे नितीन गडकरींची पोस्ट?
गडकरींनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले, “सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दुचाकींवर टोल लावण्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मी स्पष्ट करू इच्छितो की, असा कोणताही निर्णय प्रस्तावित नाही. दुचाकी वाहनांना टोलमधून पूर्ण सूट आहे. खोट्या बातम्या पसरवून खळबळ निर्माण करणे हे पत्रकारितेच्या नीतिमत्तेला धरून नाही. मी याचा निषेध करतो.” अशी पोस्ट त्यांनी केली आहे.







