Loni Kalbhor News : लोणी काळभोर : भारताच्या ७६व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये लहान मुलांची चित्रकला स्पर्धा शनिवारी (ता.१२) संपन्न झाली. या स्पर्धेत चिमुकल्यांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला आहे.
लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन विश्वराज हॉस्पिटलच्या फ्रंट ऑफिसच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेत ५-१० वयोगटातील लहान मुलांना सहभाग घेतला होता. मुलांना या स्पर्धेसाठी लागणारे सर्व साहित्य हॉस्पिटलतर्फे उपलब्ध करून देण्यात आले होते.
या स्पर्धेत ३५ हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेत अक्षरा खंडू माळी हिने प्रथम, वेदिका सचिन भालके हिने द्वितीय तर हेमा सुधीर आटोळे हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. या स्पर्धेत मुलींनी बाजी मारली आहे. Loni Kalbhor News
दरम्यान, सदर स्पर्धेचे पंच म्हणून एच.आर. प्रमुख हर्षा पालवे, क्वालिटी मॅनेजर डॉ. पल्लवी टिळेकर आणि डिजिटल मार्केटिंग प्रमुख रचना बुदीदा यांनी जबाबदारी सांभाळली. Loni Kalbhor News स्पर्धेतील विद्यार्थ्यांना विश्वराज हॉस्पिटलचे पेडियाट्रिक विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत सहारे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी हॉस्पिटलचे जनरल मॅनेजर सुधीर उत्तम, डॉ श्रीकांत सूर्यवंशी, डॉ.तबरेज पठाण, डॉ.प्रतीक मेमाणे, डॉ.धिरजा, डॉ. श्रीनिवास आदी मान्यवर उपस्थित होते.