(Loni Kalbhor News) लोणी काळभोर, (पुणे) : जागतिक आरोग्य संघटनेच्या मते ६० टक्के आजार किंवा रोग सुरक्षित शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या व योग्य परिसर स्वच्छतेच्या अभावामुळे होतात. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवणे ही गोष्ट वैयक्तिक व सामूहिक दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. वैयक्तिक स्वच्छते इतकेच परिसर स्वच्छतेला महत्त्व दिले तर आपल्या गावाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. असे मत लेफ्टनंट कर्नल सोनिया सकलानी यांनी केले.
पथनाट्याद्वारे जनजागृती…!
लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत कॉलेन ऑफ नर्सिंग एएफएमसी कॉलेज पुणे यांचे वतीने पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी “पाणी अडवा पाणी जिरवा” या संबंधी पथनाट्याचे औयोजनहि केले होते. यावेळी लेफ्टनंट कर्नल सोनिया सकलानी बोलत होत्या. यावेळी ४५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. लोणी काळभोर परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यापुढे बोलताना सकलानी म्हणल्या, “विशेषतः कुपोषित बालकांवर अशुद्ध पाणी, प्रदूषित परिसरच प्रतिकूल परिणाम करतो. यामुळे परिसर स्वच्छ ठेवणे ही सामुहिक जबाबदारी आहे. परिसर स्वच्छता एकदाच करून भागणारी गोष्ट नाही तर सतत चालणारी प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांचे स्वस्थ आरोग्य हिच राष्ट्राची खरी संपत्ती आहे. यांमुळे सुदृढ भारतासाठी सुदृढ युवा तयार करणे ही काळाची गरज आहे.”
दरम्यान, कन्या प्रशालेत किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी काळभोर या ठिकाणी नवजात शिशु व गरोदर महिला यांच्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पथनाट्य सादर करून गरोदर मातांचे प्रबोधन केले. गरोदरपणात, प्रसुतीदरम्यान व प्रसुतीनंतर कोणती काळजी घ्यायची. स्तनपानाचे महत्त्व, व विविध भित्तीचित्रे व देखाव्यांचा वापर करण्यात आला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Loni Kalbhor News : लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ललिता काळभोर बिनविरोध..!