पाचगणी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले पाहिजे. या व्यासपीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्तगुणांना चालना मिळेल. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळत आहे. असे प्रतिपादन महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांनी केले.
पांचगणी (ता. महाबळेश्वर) येथील सेंट पीटर हायस्कूलच्या सभागृहात तहसील कार्यालय व पंचायत समिती महाबळेश्वर यांच्या सयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित स्वातंत्र्याचे गाऊ गान या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना वरील प्रतिपादन तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांनी केले आहे. यावेळी महाबळेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण मरभळ,गटशिक्षण अधिकारी आनंद पळसे, महाबळेश्वर इंनरव्हील क्लबच्या अध्यक्षा स्वाती बिरामने आदी मान्यवर उपस्थित होते.
सेंट पीटर हायस्कूलमध्ये आज दिवसभर समूहगीत व लोकनृत्य स्पर्धा पार पडल्या. यामध्ये मुसळधार पाऊस असूनही दुर्गम अशा आणि कोयना जलाशयाच्या पलीकडे असणाऱ्या शाळांनीही या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धेचा निकाल समूहगीत प्राथमिक विभाग प्रथम जिल्हा परिषद शाळा वेळापूर, द्वितीय सौंदरी तर तृतीय नगरपालिका शाळा क्रमांक १ पाचगणी यांनी मिळविला आहे. तर लोकनृत्य प्राथमिक विभाग प्रथम जिल्हा परिषद शाळा भोसे, द्वितीय नगरपालिका शाळा क्रमांक २ पाचगणी आणि तृतीय जिल्हा परिषद शाळा कुंभरोशी यांना पटकाविला आहे. लोकनृत्य माध्यमिक विभागात प्रथम संजीवन हायस्कूल, द्वितीय हिल रेंज हायस्कूल भिलार आणी तृतिय एम आर भिलारे हायस्कूल राजपुरी तर उत्तेजनार्थ विद्यानिकेतन हायस्कूल पाचगणी यांचा आला आहे.
दरम्यान, विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात आले. तर सहभागी संघाना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. तर सर्व परीक्षकांचा ही यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटसाधन केंद्रातील कर्मचारी सचिन चव्हाण, गणेश पोकळे, भास्कर कोळी, कुलदीप अहिवळे, स्नेहल जेऊरकर, अभिजीत खामकर, पुनम घुगे यांनी प्रयत्न केले. तर
श्रीनिधी जोशी यांनी कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन केले.
यावेळी पांचगणी रोटरी अध्यक्ष भूषण बोधे, नितीन कासुर्डे, कै. एम आर भिलारे हायस्कूल च्या मुख्याध्यापिका तेजस्विनी भिलारे, पत्रकार रविकांत बेलोशे, प्रमोद रांजणे, अमित भिलारे, केंद्रप्रमुख दीपक चिकणे, प्रकाश भिलारे, दिलीप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित कारंडे, संजय सोंडकर आकांक्षा बोंगाळे, रईसा शेख, सायली कदम यांनी केले. तर तंत्रसहाय्य योगेश देशमाने, विष्णू ढेबे, वसीम वारुणकर व राजू सपकाळ यांनी केले.