पुणे : नवोदय विद्यालय समितीने आज जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेचा(JNVST) इयत्ता 6 वीच्या प्रवेशासाठीचा निकाल 2022 जाहीर केला आहे. इयत्ता 6 वी प्रवेशासाठी JNV निकाल आता विद्यार्थ्यांना navodaya.gov.in वर ऑनलाइन उपलब्ध आहे.
अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या अधिकृत सूचनेनुसार, उमेदवारांची तात्पुरती यादी 10 जुलै 2022 रोजी घोषित केली जाईल.
NVS ने जाहीर केलेल्या गुणवत्ता यादीमध्ये जवाहर नवोदय विद्यालयाच्या विविध शाखांमध्ये प्रवेशासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची नावे असतील.
जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी, JNVST ही देशातील 600 हून अधिक JNVs मध्ये इयत्ता 6 व्या प्रवेशासाठी आयोजित केलेली राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा आहे.
असा पहा निकाल :
१. जेएनव्हीएसटीच्या अधिकृत वेबसाइटला navodaya.gov.in वर भेट द्या.
२. वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर, तुम्हाला ‘इयत्ता VI निवड चाचणी निकाल’ दिसेल. शोधण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
३. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. आता तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख टाका आणि सबमिट करा.
४. तुम्ही सबमिट करताच तुमचा निकाल तुमच्या समोर स्क्रीनवर दिसेल. आता तुम्ही त्याची प्रिंट काढू शकता.