लोणी काळभोर – भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. मागील ७५ वर्षांमध्ये भारताने अनेकचढ उतार पाहिले. अनेक आव्हानाचा सामना करत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)याने स्पेस तंत्रज्ञानात भारताला समृद्ध केले आहे. भारत स्पेसतंत्रज्ञानामध्ये जगात महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. असे मत इस्त्रोचे शास्त्रज्ञ डॉ. पी. जी. दिवाकर यांनी मांडले आहे.
एमआयटी आर्ट, डिझाईनआणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या सातव्या तुकडीच्या स्वागत कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी अटल इनोव्हेश मिशनचे माजी अध्यक्ष डॉ. रमान्न रामनाथन,डॉ. उज्ज्वल पाटणी, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेशकराड, डॉ. संजय उपाध्ये, डॉ. सुनीता मंगेश कराड, डॉ. अनंत चक्रदेव, डॉ. महेश चोपडे,डॉ. किशोर रवांदे. डॉ. रजनीश कौर सचदेव बेदी, रामचंद्र पुजेरी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
डॉ. पी. जी. दिवाकर म्हणाले,विद्यार्थ्यांनी देशाच्या विकासासाठी तंत्रज्ञान आणि विज्ञानाची कास धरावी. भारत हाजगातील एकमेव देश आहे, जो कोणत्याही अपयशाविना मंगळावर आपले पाऊल ठेवले. चंद्र हा उपग्रहअत्यंत युनिक आहे. यासाठी अनेक मिशन घेण्यात आले. चंद्रयान मिशन भारतातील अशाच विद्यापीठातूनआलेल्या शास्त्रज्ञानाच्या मेहनतीनी यशस्वी झाले. आम्ही भारतीयांनी चंद्रावर पाण्याचा शोध लावला. आज सर्व जग भारतीय स्पेस मिशनचे आदर करत आहे.
आज संपूर्ण जग चंद्राकडे पाहत आहेत. चंद्र हा पृथ्वीच्या अत्यंत जवळ असून भविष्यात येथे मानवी वस्ती तयार होतील.इस्त्रो सुर्यवर ही जाण्याचा मिशन तयार करत आहे. संपूर्ण देश स्पेस तंत्रज्ञानाच्याविकासावर अवलंबून आहे. कम्युनिकेशनसाठी स्पेस तंत्रज्ञानाचा महत्वाचा आहे. ड्रोनद्वारेशेतीच्या विकासासाठी कार्य होत आहे. स्टॅटेलाईट बेस माहितीच्या आधारे सर्व क्षेत्रातप्रगती करत आहे.
दरम्यान, लष्करी सामर्थ्य, कृषी, मत्स व्यवसाय, ड्रोन तंत्रज्ञानयात शक्तिशाली देश म्हणून ओळखला जात आहे. भारतहा जगातील सर्वात मोठी युवा शक्ती असलेला देश आहे, जो विकासाला वेगाने पुढे नेण्यास सक्षम आहे.अचूक आणि प्रभावी मुत्सद्देगिरीचा परिणाम म्हणून जागतिक स्तरावर भारताचे स्थानसातत्याने मजबूत होत असल्याचे मत शास्त्रज्ञ आणि इस्रोचे माजी वैज्ञानिक सचिव डॉ. पी. जी. दिवाकर यांनी व्यक्त केले.
रमन्ना रामनाथन म्हणाले जागतिक दर्जाच्या विद्यापीठातून शिकण घेणे हे सर्व विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. एमआयटीएडीटी विद्यापीठात जागतिक दर्जाच्या शिक्षणासह सर्वांगिण विकास करण्यासाठी प्रयत्नकेले जाते. संशोधन आणि उद्योजकता निर्मितीचे कार्य या विद्यापीठातून केले जाते. डॉ.अब्दुल कलाम यांच्यासारखे संशोधन घडवे. आजच्या युगात अनेक अडचणी असल्यातरी अनेक संधीसुद्धा आहेत. विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न करावे.
प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, नव्या युगाच्या विद्यापीठात आपले स्वागत आहे. आगामी चार वर्षात विद्यार्थ्यांच्यासर्वांगिण विकासासह देश सेवेसाठी नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व निर्माण केले जातील. उद्योजकघडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अपयशाला यशाची पहिली पायरी समजून आपले कार्यसुरू ठेवा, तुम्हाला यशापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही.
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले, एमआयटी एडीटी विद्यापीठ हे शिक्षणाचे स्वर्ग आहे. बदल्यात युगात करिअर घडविण्यासाठीकान उघडे ठेवा. भारतीय संस्कृतीचे सर्वांगिण दर्शन या कॅम्पसमध्ये घडते. एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या सातव्या तुकडीचे स्वागत उत्साहात करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. स्नेहा वाघटकर आणि डॉ. अशोक घुगे यांनी केले.