लोणी काळभोर : गुजरात येथे होणाऱ्या 36 व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत रोईंग या खेळ प्रकारासाठी एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे विद्यार्थी हर्षिता पाटील, नेहा बदे, आर्या तुपे आणि संदीप भापकर यांची निवड झाली आहे. ‘खेल से एकता का उत्सव’ (खेळातून एकता साजरी करणे) या थीमसह 36 व्या राष्ट्रीय खेळ स्पर्धा आयोजित केले जात आहेत. या स्पर्धा 29 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत गुजरात मधील अहमदाबाद, गांधीनगर, सुरत, वडोदरा, राजकोट आणि भावनगर शहरात होणार आहेत.
हर्षिता पाटील, आर्या तुपे आणि नेहा बदे यांनी विद्यापीठ स्तरावरील रोईंग स्पर्धेत एमआयटी एडीटी विद्यापीठाला पदक मिळवून दिले आहे. 36 व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत ही यशात सातत्य ठेवत चमकदार कामगीर करतील. विद्यापीठातर्फे या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्य केले जात आहे. ऑलिम्पिकच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमधील चांगले खेळाडू तयार करण्याचे आमचे ध्येय आहे, अशी भावना एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी व्यक्त केली. यावेळी प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, विद्यार्थी विभागाचे प्रमुख डॉ. रामचंद्र पुजेरी, क्रिडा विभागाचे संचालक प्रा. पद्माकर फड यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, जम्मु – श्रीनगर येथील दल लेकमध्ये आयोजित 5 वी अंतरराजिय राष्ट्रीय स्पर्धेत एमआयटी एडीटी विद्यापीठातील आनुष्का अर्जून गर्जे आणि भाग्यश्री केशव घुले यांनी पेअर प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. याबद्दल विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी अभिनंदन केले.