लहू चव्हाण
पाचगणी : खिंगर (ता.महाबळेश्वर) परिसरात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडते आहे. वाढत्या थंडीपासून बचाव व्हावा यासाठी खिंगरचे सुपुत्र व मुंबई येथील ‘अलूर फॅशन’चे मालक सर्जेराव लक्ष्मण आंब्राळे व त्यांचे चिरंजीव नीरज आंब्राळे यांनी केंद्र शाळेतील ९३ विद्यार्थ्यांना व शिक्षकांना स्वेटर वाटप करण्यात आले .
यावेळी खिंगर ग्रामपंचायतीचे सरपंच दिनकर आनंदा मोरे, उपसरपंच विठ्ठल दुधाणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन दुधाणे, उद्योजक अमोल माने, मुख्याध्यापक संजय पार्टे, शिक्षक संजय कांबळे, शिक्षिका रेहाना बालदार, ज्योती हगवणे, राजेश्री आंब्राळे, उज्वला जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
खिंगर येथील तरूण उद्योजक नितीनशेठ दुधाणे, विशाल दुधाणे, सचिन दुधाणे.यांची सततची शाळेला काहीतरी मिळवून देण्याची धडपड असते. दातृत्वाचा मोठेपणा दाखवून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सर्जेराव लक्ष्मण आंब्राळे व त्यांचे चिरंजीव नीरज आंब्राळे या पिता-पुत्रांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खिंगर यांच्या वतीने आभार मानण्यात आले.