सुरेश घाडगे
परंडा : तालुक्यातील दहिटणा जिल्हा परिषद शाळेत वृक्षसंवर्धन समितीचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष मुख्याध्यापक सुधीर वाघमारे यांच्या वतीने ११५ विद्यार्थ्यांना कल्पवृक्ष म्हणून ओळख असलेल्या नारळाच्या रोपांचे वाटप ( दि. १७ ) केले.
विद्यार्थ्यांवर शिक्षणाबरोबरच वृक्ष संवर्धन करण्यासाठी सलग दुसर्या वर्षी सर्व विद्यार्थ्यांना नारळाच्या रोपांचे वाटप केले आहे. मुलांनी रोपांची लागवड करून त्यांचे जतन करावे आणि त्यातून त्यांच्यात पर्यावरणाची जाणीव जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येतो. वर्षभर ज्या मुलांनी वृक्ष चांगले जोपासले आणि वाढविले त्यांना बक्षीसही दिले जाते.
दरम्यान, गेल्या वर्षभरात उत्कृष्ट वृक्ष संवर्धन करणारे विद्यार्थी – प्रथम क्रमांक बक्षीस १००० रूपये सिद्धी नानासाहेब काकडे, द्वितीय क्रमांक बक्षीस ७०० रू . विराज दयानंद भांड, तृतीय क्रमांक बक्षीस ५०० रू . तन्मय छत्रपती काकडे, उत्तेजनार्थ बक्षीस ३०० रू . श्रेयस नितीन दाभाडे व १०० रू . सुजित भिमराव काळे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पिंपळवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र कवडे , वृक्षसंवर्धन समितीचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष उमेश नलवडे,जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे संचालक रविंद्र कापसे,साने गुरूजी शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानेश्वर देवराम,सचिव दैवान पाटील,शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष शाहीर शरद नवले, नागनाथ काकडे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अतुल तेलंगे, विशाल काकडे, मनोहर काकडे, ह.भ.प.मुकुंद करडे, गणेश काकडे नागरिक व शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुधीर वाघमारे यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश ठवरे व आभार प्रदर्शन भालचंद्र शिरगिरे यांनी केले.