लहू चव्हाण,
Tejaswini Bhilare : पाचगणी, (सातारा) : वर्ल्ड वाईड आचिव्हर्स दिल्ली या संस्थेचा मोस्ट अँडमायर प्रिन्सिपल अवार्ड या पुरस्काराने हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका तेजस्विनी जतीन भिलारे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. Tejaswini Bhilare
मुंबई येथील हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे वर्ल्ड वाईड आचिव्हर्स दिल्ली या संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मोस्ट अँडमायर प्रिन्सिपल अवार्ड हा पुरस्कार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, परराष्ट्र व्यवहार आणि शिक्षण राज्यमंत्री राजकुमार सिंग, एमराती बिजनेस ग्रुपचे चेअरमन डॉ .बु. अब्दुल्ला, सिनेअभिनेता गूलशन ग्रोव्हर, गायक कुमार सानू, अभिजित भट्टाचार्य यांच्या हस्ते सौ. तेजस्विनी भिलारे यांनी स्वीकारला.
दिल्ली येथील वर्ल्ड वाईड आचिव्हर्स आणि झी न्यूज प्रायोजक असलेल्या संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येतो त्यांच्या कार्याची इतरांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने हे पुरस्कार देण्यात येतो.सौ.तेजस्विनी भिलारे स्व. बाळासाहेब भिलारे यांच्या स्नुषा असून हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका असून, कै. एम. आर. भिलारे हायस्कूल राजपुरी येथे मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहेत.
दरम्यान, त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. भिलारे यांना मिळालेल्या पुरस्कार बद्द्ल आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, महाबळेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती संजय गायकवाड, हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा भिलारे, भिलारचे सरपंच शिवाजी भिलारे, प्रविण भिलारे, राजेंद्र भिलारे यांच्यासह शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.