गणेश नारंग
Daund News दौंड : दौंड येथील वाहेगुरू सेवा संस्थेने सामाजिक बांधिलकी जपून शहरातील जनता माध्यमिक विद्यालय व ल. ब अगरवाल शाळा या दोन्ही शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकांचे वाटपशनिवारी (ता.१) करण्यात आल्या आहेत. (Daund News)
याबाबत बोलताना वाहेगुरु सेवा संस्थेचे अध्यक्ष राम डावरा म्हणाले कि, कोणीही शिक्षणा पासून वंचित राहू नये, सर्वांना शिक्षण घेता यावे. शिक्षण घेताना आवश्यक असलेल्या वह्या पुस्तकांची कोणत्याही विद्यार्थ्याला अडचण येऊ नये. या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. असे डावरा यांनी यावेळी सांगितले आहे.
दरम्यान, कोरोना काळात देखील वाहेगुरु सेवा संस्थेने दौंडमधील गोरगरीबांना मदतीचा हात दिला होता.या संस्थेने पहिल्या लॉकडाऊन मध्ये २ हजार नागरिकांना २ वेळेस मोफत जेवण व गरजू रुग्णांना मोफत औषध उपचाराची सोय केली होती.
कोरोनाच्या दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये दौंडमध्ये सर्वांसाठी मोफत कोव्हीड सेंटर उभारण्यात आले होते.
यावेळी २ वेळेसचे जेवण, आरोग्यवर्धक काढा, फळ, हळदीचे दूध इत्यादी सर्व सेवा तसेच सर्व औषधोपचार मोफत करण्यात आला. त्यामुळे वाहेगुरु सेवा संस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे.