Monday, November 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Buldhana Accident News : बुलढाणा बस अपघातातील २४ मृतदेहांवर आज सामूहिक अंत्यसंस्कार ; मन हेलावणारा आक्रोश, एका मृतदेहावर आज अंत्यसंस्कार नाही, कारण..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 2 July 2023, 11:57

Buldhana Accident News : समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटा शिवारात शनिवारी मध्यरात्री खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात २५ जणांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस दुभाजकाला आदळून बसची डिझेलची टाकी फुटली आणि बसला आग लागली. बसमधून प्रवाशांना बाहेर पडता न आल्यामुळे प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.(Buldhana Accident News)

अपघातात २५ जणांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान, फॉरेन्सिक टीमने २४ तास प्रयत्न केले तरी सर्व मृतदेहांची डीएनए चाचणी करून मृतदेह कुणाचा हे कळायला कमीतकमी पाच दिवस लागतील असे सांगितले जात आहे. मात्र, जळालेल्या अवस्थेतील मृतदेह ३ दिवसांपेक्षा अधिक काळ ठेवणे कठीण आहे. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी मृतदेह ताब्यात देताना येणाऱ्या अडचणींसंदर्भात नातेवाईकांशी चर्चा केली. सर्वांनी मिळून बुलढाण्यातच सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचे निश्चित केले.(Buldhana Accident News)

बुलडाण्यातील त्रिशरण चौकातील स्मशानभूमीत हा अंत्यविधी होणार आहे. अंत्ययात्रेची तयारी सुरू असताना नातेवाईकांचा एकच आक्रोश केला. मन हेलावणारी अशी दृश्य याठिकाणी पाहायला मिळत आहेत. (Buldhana Accident News)अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २५ जणांपैकी एक मृतदेह हा नागपूर येथील झोया या मुस्लिम तरुणीचा आहे. रात्री उशिरा तिचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात पोहचले. आम्हाला मृतदेह दफन करायचा असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी मंत्री गिरीश महाजन आणि आमदार श्वेताताई महाले यांनी रात्री दोनपर्यंत झोयाच्या नातेवाईकांशी चर्चा केली. आम्हाला आमच्या मुलीचा मृतदेह ओळखता येईल, असे तिचे नातेवाईक म्हणाले.

दरम्यान, २५ पैकी एका मृतदेहाचा चेहरा आणि शरीराची ठेवण पाहून तो मृतदेह झोयाचा असल्याचे तिच्या नातेवाईकांचे मत आहे. त्यामुळे झोयाच्या नातेवाईकांनी दावा केलेला मृतदेह सोडून उर्वरित २४ मृतदेहांवर आज अंत्यविधी करण्यात येणार आहे. “त्या” मृतदेहाची डीएनए चाचणी केल्यानंतर तो मृतदेह झोयाचाच असल्याचे निश्चित झाल्यावर तो तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल. मात्र, तसे निष्पन्न न झाल्यास त्यावर सुद्धा विधिवत अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने ठरवण्यात आले.(Buldhana Accident News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातावेळी नेमकं काय घडलं याची माहिती घेतली. ‘झालेली घटना दुर्दैवी आहे, सकाळपासूनच आम्ही कलेक्टर, एसपी आणि आयजींच्या संपर्कात होतो. प्रत्यक्ष पाहिल्यानंतर अपघाताची भीषणता लक्षात येते. लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. आठ माणसं बाहेर निघाली आणि आठ जखमी झाली,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.(Buldhana Accident News)

समृद्धी महामार्गावरील अपघात चालकांच्या चुकांमुळे झाले आहेत. सरकारने हे प्रकरण गांभिर्याने घेतलं आहे. सगळी यंत्रणा जागेवर पोहोचली; मात्र, दरवाजा बंद असल्यामुळे त्यांना बाहेर येता आलं नाही. अपघात होऊ नये म्हणून सरकारला काही करायला हवं ते सरकार करेल, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं.(Buldhana Accident News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

एक-दोन नव्हे, तरुणीचे तब्बल 11 बॉयफ्रेंड! तीन मुलांविरोधात तक्रार करायला गेली अन्…

Sunday, 1 November 2026, 22:37

उद्घाटनाआधीच पुणे मेट्रोची पोलखोल! स्टेशनमध्ये पाण्याची गळती; कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

Sunday, 1 November 2026, 21:32

पुण्यातील कंपनीत 5 लाखांची चोरी, शिक्रापूर पोलिसांनी थेट हरियाणातून आरोपीला पकडलं; दोन जणांना ठोकल्या बेड्या

Sunday, 1 November 2026, 20:17

दरीत कोसळली कार, समोर होतं मृत्यूचं संकट; पुण्यात एका झाडाने तिघांना दिलं जीवदान; नेमकं काय घडलं? वाचा

Sunday, 1 November 2026, 19:21

Pune News: एकामागून एक 8 चोऱ्या; अखेर दोन आंतरराज्यीय चोरटे पोलिसांच्या जाळ्यात, 5.50 लाखांचा माल जप्त

Sunday, 1 November 2026, 18:54

शिक्षणात आघाडी, तरी नोकरीत सुरक्षिततेचा पत्ता नाही; पुण्यातील तरुणांसमोर नेमकं कोणतं संकट? धक्कादायक वास्तव उघड

Sunday, 1 November 2026, 18:28
Next Post

Buldhana Accident News : आपत्कालीन स्थितीत जीव वाचवायचा कसा चालक वाहकांना प्रशिक्षण, प्रवाशांना द्यावी माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp