उरुळी कांचन, (पुणे) : येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधानाचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक श्रेया चव्हाण यांनी करून विद्यार्थ्यांना संविधानाची प्रत दाखवून ओळख करून दिली. प्रा. बंडू उगाडे यांनी आपल्या मनोगतातून संविधानाने मानवाला दिलेले मुलभूत अधिकार त्यांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या याविषयी मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब भगत व उपप्राचार्य डॉ. अविनाश बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाचे स्वागत राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.रविद्र मुंढे यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजनेमधील स्वयंसेविका प्रतिक्षा माधव मुल्या हिने सूत्रसंचालन केले व सरनाम्याचे वाचन करून घेतले. लिंबाजी रमेश आगलावे या स्वयंसेवकाने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. कमरून्निसा शेख यांनी मानले.
यावेळी प्राध्यापक डॉ. अमोल बोत्रे, डॉ. निलेश शितोळे, डॉ. समीर आबनावे, प्राध्यापक सारिका ढोनगे, ज्ञानदेव पिंजारी, सुजाता गायकवाड, विजय कानकाटे, अनुप्रिता भोर, अंजली शिंदे, प्रा. शुभांगी रानवडे, प्रा. नंदिनी सोनवणे, शारीरिक शिक्षण संचालक करण जैन, गायत्री कुलकर्णी, बर्गे, रोहिणी शिंदे, आदी प्राध्यापक व स्वयंसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रदीप राजपूत, मोरेश्वर बगाडे, व विशाल महाडिक यांचे सहकार्य लाभले.