पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 2025 दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 15 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु होणार आहे. दहावीची परीक्षा 18 मार्चला संपणार आहे. यानंतर बारावीची परीक्षा 4 एप्रिलाला संपणार आहे. सीबीएसईने मुख्य परीक्षेचे वेळापत्रक गेल्या वर्षीच्या तुलनेत लवकरच म्हणजे 23 दिवस आधी प्रसिद्ध केले आहे.
इयत्ता 10 वीच्या वेळापत्रकाव्यतिरिक्त बोर्डाने CBSE वर्ग 12 ची तारीख पत्रक 2025 देखील जारी केले आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी सुरु होणार आहेत. दहावीचे पेपर 10:30 ते 01:30 दरम्यान आयोजित केले जातील. बारावीच्या परीक्षेची वेळ देखील हिच असेल.
असे डाऊनलोड करा परीक्षेचे वेळापत्रक
• सर्वप्रथम तुम्ही CBSC च्या अधिकृत वेबसाइटवर (cbse.gov.in) वर जा
• CBSC 10 वी तारीख पत्रक 2025/CBSC 12वी तारीख पत्रक 2025 या लिंकवर क्लिक करा
• आता स्क्रीनवर PDF दिसेल
• ती PDF File पाहा आणि ते डाऊनलोड करुन घ्या…
CBSE Exam Datesheet 2025:दहावीच्या परीक्षेचं वेळापत्रक
इंग्रजी कम्युनिकेटिव / इंग्रजी भाषा आणि साहित्य – 15 फेब्रुवारी, 2025
विज्ञान – 20 फेब्रुवारी 2025
फ्रेंच / संस्कृत – 22 फेब्रुवारी 2025
सामाजिक शास्त्रे – 25 फेब्रुवारी 2025
हिंदी कोर्स ‘अ’ / ‘ब’- 28 फेब्रुवारी 2025
गणित – 10 मार्च, 2025
माहिती तंत्रज्ञान – 18 मार्च, 2025
CBSE Exam Datesheet 2025: बारावी परीक्षा डेटशीट
शारीरिक शिक्षण – 15 फेब्रुवारी 2025
भौतिकशास्त्र – 21 फेब्रुवारी 2025
व्यवसाय शिक्षण – 22 फेब्रुवारी 2025
भूगोल – 24 फेब्रुवारी 2025
रसायनशास्त्र – 27 फेब्रुवारी 2025
गणित – मानक / उपयोजित गणित – 8 मार्च, 2025
इंग्रजी वैकल्पिक / इंग्रजी आवश्यक – 11 मार्च, 2025
अर्थशास्त्र – 19 मार्च, 2025
राज्यशास्त्र – 22 मार्च, 2025
जीवशास्त्र – 25 मार्च, 2025
लेखांकन – 26 मार्च, 2025
इतिहास – 1 अप्रैल, 2025
मानसशास्त्र – 4 अप्रैल, 2025