पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शुक्रवारी (ता. २२ )इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर केला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी निकाल जाहीर होण्याबाबत सांगितलं होतं की, सीबीएसईचा निकाल जाहीर होण्यास कोणताही विलंब झालेला नाही. २ बोर्डाची टर्म परीक्षा १५ जून रोजी संपली आणि त्यानंतर तपासणीचे काम सुरू झाले. ते पुढे म्हणाले की, सीबीएसईचा निकाल तपासण्यासाठी ४५ दिवस लागतात, आज फक्त ३० दिवस झाले आहेत.
सीबीएसई बोर्डाकडून या वर्षी बारावी बोर्डाच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in, results.cbse.nic.in वर त्यांचा निकाल पाहू शकणार आहेत. त्याशिवाय cbse.gov.in किंवा cbseresults.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवरही बघाता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि शाळा क्रमांक टाकावा लागणार आहे.
दरम्यान, निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्यावी. त्यानंतर मुख्यपृष्ठावर दिसणार्या १० वी किंवा १२ वीच्या निकालाशी संबंधित लिंकवर क्लिक करावे. येथे तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आदींची माहिती प्रविष्ट करून सबमिट करा. यानंतर तुम्हाला स्क्रिनवर तुमचा परीक्षेचा निकाल दिसून येईल.