दिनेश सोनवणे
दौंड : फुरसुंगी येथे झालेल्या जिल्हास्तरीय मास रेसलिंग, नॉनचाकु आणि किक बाॅक्सिंग स्पर्धेमध्ये खडकी (ता. दौंड) येथील ब्राइट फ्यूचर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ५३ सुवर्ण,२७ रौप्य व ३२ कांस्य पदकांची कमाई केली आहे. या स्पर्धेत शाळेच्या विविध गटातून ३९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे.
पुणे जिल्हा ट्रॅडिशनल रेसलिंग यांच्या संयुक्त विद्यमाने या रेसलिंग नॉनचाकु आणि किक बाॅक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत खडकी (ता. दौंड) येथील ब्राइट फ्यूचर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत ५३ सुवर्ण,२७ रौप्य व ३२ कांस्य पदकांची विद्यार्थ्यांनी कमाई केली आहे. त्यामुळे खडकीच्या ब्राइट फ्यूचर इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला व प्रथम क्रमांकाचा चषक मिळवला आहे.
दरम्यान, सर्व यशस्वी विद्यार्थी व क्रिडा शिक्षक प्रदिप शिवपुजे यांचा गुण गौरव व सत्कार संस्थेचे अध्यक्ष राजू गायकवाड, खजिनदार तुषार काळे, मुख्याद्यापक रघुनाथ झोळ यांच्या हस्ते करण्यात आला. मान्यवरांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.