लोणी काळभोर : अभियंता दिनानिमित्त लोणी काळभोर (ता. हवेली ) येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठात एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग विभागातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षी १५ सप्टेंबर हा दिवस देशात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस देशाचे महान अभियंता आणि भारतरत्न पुरस्कार विजेते मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना समर्पित आहे. एम विश्वेश्वरय्या यांनी राष्ट्र उभारणीत खूप मोठे योगदान दिले होते. यानिमित्ताने भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिवस साजरा करत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डीयुआरओचे व्यवस्थापक अनिल गोयल, डसॉल्ट सिस्टिमचे विनायक फुटाने, रिलायंस जिओचे सहाय्यक उपाध्यक्ष डॉ. मुन्निर सय्यद, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी विश्वेश्वरय्या जयंतीनिमित्ता त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले.
यावेळी बोलताना अनिल गोयल म्हणाले, हा दिवस देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या देशातील सर्व अभियंत्यांच्या परिश्रम आणि समर्पणाला सलाम करण्याचा दिवस आहे. या अभियंत्यांच्या अथक परिश्रमामुळे लोकांच्या जीवनात मोठा बदल झाला आहे. देशातील अभियंत्यांनी त्यांच्या शोधांमुळे सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य केले आहे. अशी भावना गोयल यांनी व्यक्त केली
दरम्यान, एमआयटी एडीटी विद्यापीठातर्फे डीयुआरओचे व्यवस्थापक अनिल गोयल यांनी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच डसॉल्ट सिस्टिमचे विनायक फुटाने एमिनंट इंजिनिअर्स, तर रिलायंस जिओचे सहाय्यक उपाध्यक्ष डॉ. मुन्निर सय्यद यांना इंजिनिअर ऑफ इअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी डॉ. सुनीता कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग विभागाचे प्रिन्सिपल डॉ. किशोर रवांदे, अधिष्ठात रजनीश कौर बेदी, दीपक शिकारपूर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
.