पुणे : एसएससी आणि एचएससी म्हणजेच दाहावी आणि बारावी बोर्ड परिक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.कोरोना महामारीचे सर्वप्रकारचे निर्बंध उठल्यानंतर परिक्षा नियमांमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत.
गेले दोन वर्ष कोरोनामुळे काही महत्वाचे बदल करण्यात आले होते. परिक्षा पध्दती, परिक्षेचा कालावधी, परिक्षा केंद्र याबाबत विशेष फेरबदल केले होते. म्हणजेचं २०२१ आणि २०२२ या कालावधीत एसएससी आणि एचएससी परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना ८० गुणांच्या पेपरसाठी वाढीव अर्धा तास म्हणजे अडीच तासाच्या ऐवजी तीन तास कालावधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. इतर परिक्षा केंद्र न देता होम सेंटर म्हणजेच स्वत:च्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालायात जावून पेपर द्यायचे होते. एवढचं नाही तर एकूण अभ्यासक्रमापैकी २५ टक्के अभ्यासक्रम वगळण्यात आला होता.
2023 मध्ये होणाऱ्या एचएससी आणि एसएससी परिक्षा पूर्ण अभ्यासक्रमावर होणार आहेत. तसेच दहावी बारावीच्या २०२३ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी होम सेंटर राहणार नाही. म्हणजे विद्यार्थ्यांना बोर्डाकडून अलॉट केलेल्या सेंटरवर जावून परिक्षा द्यावी लागणार आहे. तर 80 गुणांच्या पेपरसाठी दिलेला वाढीव अर्धा तास यावेळी दिला जाणार नाही. म्हणजे विद्यार्थ्यांना ८० गुणांचा पेपर आता फक्त अडीच तासात सोडवावा लागणार आहे. तसेच यावेळी १०० टक्के अभासक्रमावर परिक्षा होणार आहे.
औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने याबाबत माहिती दिली आहे. तरी राज्यभरातील एसएससी आणि एचएससी विद्यार्थ्यांनी याबाबत नोंद घ्यावी. राज्यभरातील शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयाला देखील याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षाची परिक्षा फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात येणार आहे.