Big Breaking News! : पुणे : पुणे जिल्हा प्राथमिक शाळाची वेळ कमी होऊन सकाळी साडेसात ते साडेदहा पर्यंत करण्यात यावी. यासाठी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने मागणी केली आहे. या मागणीच्या अनुषंगाने याबाबतचा निर्णय पुढील दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल. असे आश्वासन शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी दिले आहे.
दोन दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन
प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (ता.१४) जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत शनिवार सकाळी शाळेची वेळ ७:३० ते १०:३० करण्याची आग्रही मागणी करण्यात आली. (Big Breaking News! ) विशेषतः महिला वर्गाच्या होणाऱ्या अडचणीबाबत माहिती देण्यात आली. तेव्हा शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड मॅडम यांनी शनिवारी सकाळी शाळेची वेळ बदलण्याबाबत दोन दिवसांत तातडीने निर्णय घेण्यात येईल. असे आश्वासन दिले.
विज्ञान / समाजशास्त्र पदवीधर शिक्षक, टप्पा क्र.६ मधील शिक्षक, महानगरपालिका क्षेत्रातील तसेच संचमान्यतेतील अतिरिक्त शिक्षकांच्या बदल्या, (Big Breaking News! ) मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदोन्नती, रखडलेली पुरवणी बिले, याविषयी चर्चा करण्यात आली. या प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आले आहे.
दरम्यान, सन २०२२ – २३ मधील फंड स्लीपा या आठवड्यात देण्यात याव्यात तसेच फंड प्रस्तावांना तातडीने मंजूरी मिळण्यासाठी नमुना न ५२ फॉर्म भरणेसाठी प्रस्ताव पुन्हा पंचायत समितीकडे पाठविण्यात येऊ नयेत व फंड मंजूरी Online होणेसाठी सॉफ्टवेअर तयार करण्याची मागणी करण्यात आली.(Big Breaking News! ) या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश अवताडे साहेब यांनी फंड स्लीपा आठवडाभरात देण्यात येतील व सॉफ्टवेअर लवकरच तयार करण्यात येईल असे आश्वासन शिक्षक संघास दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे, सरचिटणीस खंडेराव ढोबळे, कोषाध्यक्ष माऊली पुंडे, शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष रमेश मारणे, जुन्नर तालुकाध्यक्ष रमाकांत कवडे यांच्यासह जिल्हा संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते