लहू चव्हाण
पाचगणी : मेटगुताड येथील चेतन दत्ताजी गायकवाड हायस्कूलमध्ये वनक्षेत्रपाल आर.एस.परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली शाळेमध्ये चित्ता वन्यजीव व इतर जंगली प्राणी यांच्याविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी निकम, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
चिता भारतात परत आणल्याने त्याचबरोबर इतर प्राण्याविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने शाळेमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच आपल्या देशात असणारी वनसंपदा व जंगलामध्ये राहणारे सर्व प्रकारचे सजीव याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
जंगली प्राण्यांविषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जवळीकता निर्माण व्हावी व त्यांच्याविषयी माहिती व्हावी हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. गुरेघर वनपाल आर. व्ही. काकडे यांनी वन्यजीव व वनविभागाचे कायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी वन विभाग राबवित असलेले विविध उपक्रमांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनपाल सहदेव भिसे,मेटगुताड वनरक्षक तानाजी केळगने,क्षेत्रमहाबळेश्वर वनरक्षक लहू राऊत,माघंर वनरक्षक रमेश गडदे, गुरेघर वनरक्षक वैभव शिंदे आदींनी परिश्रम घेतले.