राजेंद्र कुमार शेळके
Ambedkar Jayanti 2023 पुणे : पिरंगुट येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर Ambedkar Jayanti 2023 यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहातपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित…!
यावेळी प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी,उप प्राचार्य डॉ.महेंद्र अवघडे डॉ. प्रविण चोळके, विद्यार्थीवृंद तसेच शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. श्रीकांत देशमुख यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास व बाबासाहेब कसे आहेत आणि त्यांना समजून घेताना समाजातील मूलभूत घटकांचा डॉ.बाबासाहेबांनी योग्य तो वापर करून ही राज्यघटना तयार केली.
फुले – शाहू – आंबेडकर यांच्या मूलभूत विचारांना एकत्र करून भारताच्या राज्यघटनेत एक ऐतिहासिक नोंद केली असे गौरोवोद्गार डॉ.देशमुख यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अशोक ससाने यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.अविनाश हुंबरे यांनी मानले.