पुणे : उरुळी कांचन, आकुर्डीसह जिल्हातील विविध शिक्षण संस्थामधील बोगस शिक्षक भरतीचा पर्दाफाश करणारे पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांना चौकशीसाठी ईडी अर्थात प्रवर्तण निर्देशालयाने बोलविण्याबाबत चर्चा सुरु झाली असतानाच, दुसरीकडे उरुळी कांचन परीसरातील तीन तर यवत परीसरातील एक अशा तब्बल चार शाळात नियमबाह्य पध्दतीने शिक्षण भरती झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.
उरुळी कांचन व यवत परीसरातील वरील चार शाळांच्या संस्था चालकांनी शिक्षकांच्याकडुन भरतीवेळी लाखो रुपयांचा मलिदा घेऊन, शिक्षकांना भरती केल्याची कबुली जिल्हा परीषदेच्या शिक्षण विभागातील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने ‘पुणे प्राईम न्युज’ ला दिली आहे. वरील चारही शाळात झालेल्या नियमबाह्य शिक्षक भरतीबाबत चौकशी सुरु झाली असुन, पुढील कांही दिवसातच मलिदा देणारे व मलिदा घेणारे अशा दोघांनाही गजाआड जावे लागणार असल्याचे संबधित वरीष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
जिल्हा परीषदेचे पुणे जिल्ह्यातील एका शिक्षणसंस्थेतील शिक्षक भरतीचा मोठा घोटाळा पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांना बाहेर काढला होता. या प्रकरणाची दखल घेत ‘ईडी’ने भुजबळ यांना चौकशीसाठी येत्या दोन ऑगस्टला बोलाविले आहे. येत्या 2 ऑगस्ट रोजी ईडीच्या कार्यालयात भुजबळ यांना हजर रहावे लागणार असुन, या चौकशीतुन जिल्हातील शिक्षण सम्रांटाचा बोगस शिक्षक भरती घोटाळा ईडीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.
राज्यातील राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेनेसह, राज्यातील अनेक पक्षांच्या वरीष्ठ नेत्याना धडकी भरवणारी ईडी थेट पुणे जिल्हाच्या शिक्षण क्षेत्रात डोकावल्याने, जिल्हाच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जिल्हा परीषदेचे शिक्षण विस्तारअधिकारी किसन भुजबळ यांनी उरुळी कांचन, आकुर्डीसह जिल्ह्याच्या विविध शिक्षण संस्थामधील बोगस शिक्षक भरतीचे रॅकेट उघडकीस आनले होते. यात वरीष्ठ अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा मलिदा लाटलेला आहे. हाच मलिदा बाहेर काढण्यासाठी ईडीच्या माध्यमातुन किसन भुज ‘बळ’ यांना आनखी बळ मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान शिक्षण विभागातील वरीष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन हद्दीतील तीन तर यवत परीसरातील एका शाळेत मागिल कांही वर्षापुर्वी प्रतिशिक्षक दहा ते पंधरा लाख रुपये घेऊन, शिक्षकांची भरती करण्यात आलेली होती. जिल्हा परीषदेच्या शिक्षण विभागाने कांही महिण्यापुर्वी केलेल्या प्राथमिक चौकशीत उरुळी कांचन हद्दीत तब्बल तेराहुन अधिक शिक्षकांच्याकडुन लाखो रुपये लाटल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. तर अशाच प्रकारे यवत हद्दीतील एका शाळेतही वरील प्रमाने नियमबाह्य पध्दतीने पैसे स्विकारुन भरती झाल्याचे उघड झाले आहे. वरील चारही शाळांत झालेल्या नियमबाह्य शिक्षक भरतीची सखोल चौकशी सुरु करण्यात येणार आहे.
ईडीमुळे भुजबळ आनखी “स्ट्रॉग” होणार…
उरुळी कांचन, आकुर्डीसह जिल्हातील विविध शिक्षण संस्थामधील बोगस शिक्षक भरतीचा पर्दाफाश करणारे पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांना चौकशीसाठी बोलाविले आहे. यामध्ये भरती प्रकरणातील आणखी संशयितांची माहिती भुजबळ यांना विचारली जाण्याची शक्यता आहे. दौंडमधील घोटाळे बाहेर काढण्याचे काम चालु असतानाच, त्यांना तिथुन दोन दिवसापुर्वी हटविले आहे. मात्र इडीकडुन त्यांच्याकडे किती शिक्षकांची भरती झाली, त्यातून किती प्रमाणात मनी लाँडरिंग झाले किंवा कसे याबाबत विचारणा केली जाणार आहे. भुजबळ यांच्याकडे नियमबाह्य शिक्षक भरतीबाबत “स्ट्रॉग” असल्यामुळे व त्यांना वरील प्रकरणात थेट ईडीचे बळ मिळणार असल्याने पुढील काळात भुजबळ आणखी “स्ट्रॉग” होणार यात कसलीही शंका नाही.