अमोल वारणकर
Akola News : अकोला (निंबी) : नुकताच दहावीचा निकाल लागला असून अकोला जिल्ह्यातील निंबी गावातील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत भरघोस यश मिळवले आहे. प्रयत्नाला जिद्दीची जोड दिली की प्रतिकूल परिस्थितीतही यशाला गवसणी घालता येऊ शकते, असा काहीसा प्रवास या छोट्या गावातील विद्यार्थ्यांचा आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता.२) दुपारी १ वाजण्याच्या सुमारस ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. निंबीगावातील ११ विद्यार्थ्यांनी यंदा दहावीची परिक्षा दिली आहे. सर्व उत्तीर्ण झाले आहेत.(Celebrating the success of the 10th class students of Nimbi village)
निकाल शंभर टक्के
२ मार्च ते २१ मार्च या कालावधीत झालेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यामध्ये निंबी गावातील ११ विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. (Akola News ) यात चार मुलांचा समावेश आहे तर सात मुलींची समावेश आहे. यामध्ये माजी सरपंच मुरलीधर सगणे यांचा मुलगा महेश मुरलीधर सगणे यास ९०.४० टक्के मिळाले आहे. तर गायत्री बाळकृष्ण पाचपोहेला ८२ टक्के मिळाले आहे.
दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे
१) महेश मुरलीधर सगणे ९०.४०%
२) गायत्री बाळकृष्ण पाचपोहे – ८२ %
३) श्रुतिका दिलीप नागे – ७७.२०
४) समीक्षा अंबादास वानखडे ७५.२९%
५) प्रथमेश संतोष धोटे – ७१.६० %
६) वैष्णवी कैलास देशमुख ६० %
७) प्रसाद प्रकाश इसापुरे ६० %
८) रक्षा श्रीकृष्ण डाबेराव ५५.२० %
९) तेजस्विनी संतोष डाबेराव ५१ %
१०) अभिषेक गोपाल देशमुख ५०.४० %
११) सानिका बांगर ५० %
दरम्यान, यशस्वी झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनींचे मुख्याध्यापक राजेश तायडे, सरपंच करुणा वानखडे, ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी अभिनंदन केले. (Akola News ) तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Akola | मोठी बातमी ! अवकाळीमुळे मंदिरावर झाड कोसळले ; शेडखाली दबून 7 जणांचा मृत्यू…!