Sangli News : सांगली : ढवळी (ता.वाळवा) येथील सागर पाटील विद्यालयात दहावीच्या वर्गात सन २००१-२००२ साली शिक्षण घेत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच मोठ्या उत्साहात साजरा झाला. या स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या सदस्या सरोज नारायण पाटील (माई) या उपस्थित होत्या. तर सन २००१ – ०२ बॅच ला अध्यापन करणारे सर्व शिक्षक उपस्थित होते. स्नेहसंमेलनाची सुरवात प्रार्थनेने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना शाल, श्रीफळ व वृक्ष देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी बी.एस. क्षीरसागर, के.एस. चेंडके, वाय. डी. पाटील, एन.पी. गायकवाड, एस.डी. पाटील डी . पी. सावंत, तेली मॅडम, वर्षा मॅडम, पंडित तात्या. आदी शिक्षक उपस्थित होते. (After 22 years, the reunion of former students of class 10 of Sagar Patil Vidyalaya, Dhavali)
यावेळी बोलताना सरोज पाटील म्हणाल्या की, कोणतेही मुल वाईट नसते, प्रत्येकाकडे कोणती ना कोणती कला असते. शिक्षकांनी ते फक्त हेरून मुलांना मार्गदर्शन केल्यास विद्यार्थी जीवनामध्ये यशस्वी होतो. (Sangli News) तसेच अनेकांनी आपल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करत असल्या बद्दल समाधान व्यक्त केले.
अनेक विद्यार्थ्यांनी आठवणींना उजाळा दिला
यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये शालेय जीवनातील अनुभव व किस्से कथन करून आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या सत्कारामुळे भविष्यात आणखी काम करण्याची प्रेरणा निर्माण झाली. (Sangli News) विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहून आपल्या वैयक्तिक जीवनातील अडचणी तसेच ज्या शाळेमध्ये आपण शिकलो त्या शाळेच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावा असे मत व्यक्त केले.
दरम्यान, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद बालासो पुदाले – कोरेगाव, अश्विनी पाटील – मोरे यांनी अथक परिश्रम केले. तर यावेळी माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयास रुपये ८२ हजाराची देणगी गरजू विद्यार्थी फंडासाठी दिली. त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक माने एन.डी. यांनी विद्यालयास दिलेल्या देणगी बद्दल सर्वांचे आभार मानले.
डॉ. प्रसाद खोत, सत्यदीप पाटील, प्रकाश पाटील, मनोहर फारणे, सारिका पाटील, शुभांगी पाटील, चित्रा वायदंडे यांनी विशेष सहकार्य केले. (Sangli News) कार्यक्रमाचे सूत्र संचालन चित्रा वायदंडे, सारिका पाटील, शुभागी पाटील यांनी केले. त्यानंतर वंदे मातरम् ने या कार्यक्रमाची सांगता झाली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Sangli News : समाजात अजूनही अज्ञान, भूतबाधा काढण्यासाठी मांत्रिकाने केलेल्या मारहाणीत मुलाचा मृत्यू