अजित जगताप
सातारा : खटाव तालुक्यातील सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, जि. प. प्राथ, शाळांचे मुख्याध्यापक व मनरेगा समन्वयक यांची ‘एकजूट’ पाहण्यास मिळाली., एकजूट सर्वांगीण शालेय विकासासाठी सर्वसमावेशक शैक्षणिक प्रक्रिया तालुकास्तरीय कार्यशाळा शुक्रवार दि. ५ ऑगस्ट रोजी बचत सभागृह, पंचायत समिती खटाव (वडूज) येथे संपन्न झाली.यावेळी मान्यवरांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेला डी आय टी इ चे विजयकुमार कोकरे, गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे, राहुल खराडे, विशाल जानुगडे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यशाळेला उदंड प्रतिसाद मिळाला. शिक्षण उपलब्ध करून देणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. यासाठी गाव पातळीवर सर्व घटकांसोबत गावातील मुलांच्या शिक्षणाबाबत नेमके आणि ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. ‘एकजूट’, सर्वांगीण शालेय विकासासाठी…! या सर्वसमावेशक शैक्षणिक प्रक्रियेच्या माध्यमातून शाळांचा विकास आणि मुलांची गुणवत्ता वाढविणे बाबतचे धोरण निश्चित करून नक्कीच प्रगती साधता येईल.
ग्रामपंचायत ही ग्राम पातळीवर काम करणारी पंचायत राज व्यवस्थेतील पायाभूत संस्था आहे. स्थानिक गरजा व उपलब्ध एकजूट विषयक चित्रफित ‘एकजूट’, सर्वांगीण शालेय विकासासाठी…! या सर्वसमावेशक शैक्षणिकप्रक्रिया (सादरीकरण आणि चर्चा) मनरेगातून शाळा विकास संवाद : नियोजन आणि मनोगत उपयुक्त ठरले. चित्रफितीच्या माध्यमातून पन्नास मिनिटे माहिती देण्यात आली. ‘एकजूट’ या सर्वसमावेशक शैक्षणिक प्रक्रियेचे पी पी टीच्या माधमातून वीस मिनिटे सादरीकरण केले. मनरेगातून शाळा पंधरा मिनिटे, तीस मिनिटे, पाच मिनिटे विकासचे पी पी टी च्या माधमातून सादरीकरण करण्यात आले.
या कार्यशाळेला खटाव तालुक्यातील विविध गावचे सरपंच ग्रामपंचायत.. ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समिती- विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत/आरोग्य/शिक्षण अंगणवाडी पर्यवेक्षिका केंद्रप्रमुख,मुख्याधापक, मनरेगा समन्वयक उपस्थित होते. संगीता गायकवाड यांनी आभार मानले.
दरम्यान, वडूज शाळेचे उपशिक्षक व शिक्षण समितीचे माजी कार्याध्यक्ष श्री उमेश पाटील यांनी या कार्यशाळेसाठी उपस्थित राहून ही कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे, स्वतंत्र दिनी होणाऱ्या शैक्षणिक ग्रामसभा प्रेरणादायी ठरणार आहे असे मत व्यक्त केले.