विशाल कदम
उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयातील सुमारे २८ विद्यार्थ्यांचा मागील दीड वर्षापासुन गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण असलेला प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. या प्रलंबित प्रश्नांसाठी उरुळी कांचन भाजपा पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आहे.
पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयातील प्रथम आणि द्वितीय वर्ष कला आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी २०२१ ला परीक्षेचा फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरले होते. परीक्षेचा फॉर्म भरताना कला शाखेच्या विद्यार्थ्यांना भूगोल विषय निवडताना दोन कोड आले होते. त्यामध्ये आर्थिक भूगोल आणि पर्यावरण भूगोल असा उल्लेख केलेला नव्हता. त्यांमुळे विद्यार्थ्यांना नेमका काय कोड आहे. हे नक्की माहिती नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एक कोड निवडला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक भूगोल विषय असताना, पर्यावरण भूगोलचे पेपर आले. तर ज्या विद्यार्थ्यांचे पर्यावरण भूगोल होता. त्यांनी आर्थिक भूगोल विषयाची परीक्षा २०२२ ला ऑनलाइन पद्धतीने दिली.
तर दुसरीकडे प्रथम वर्ष वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी कम्प्युटर राईज अकाउंटिंग या विषयाच्या ऐवजी जेंडर सेन्सिव्हिटीची परीक्षा दिली. अशा प्रकारे पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयातील २६ विद्यार्थ्यांनी सुमारे दीड वर्षाहूनही परीक्षा देऊन अधिक कालावधी झाला आहे. तरी, त्यांच्या गुणपत्रिकेवर गुण आले नाहीत. त्यामुळे त्यांचा निकाल हा नापास येत आहे. दीड वर्षापासुन विद्यार्थी पायपीट करत असुन देखिल त्यांचा प्रश्न सूटलेला नव्हता.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सदर विषय उरुळी कांचन भारतीय जनता पार्टीतील पदाधिकाऱ्यांना सांगितला. त्यानंतर भाजपा पदाधिकाऱ्यांना त्वरील हालचाली करून या विषयासंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नवनियुक्त सीनेट सदस्य राहुल जी पाखरे यांच्यासोबत संपर्क केला. तसेच पुणे विद्यापीठामध्ये परीक्षा व मूल्यमापन मंडळ या विभागाकडे चौकशी सुरु केली आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून अवघ्या दोनच दिवसात २८ विद्यार्थ्यांचे गुणपत्रिकेवर गुण आले आहेत. तर फक्त १ विद्यार्थिनीचा प्रश्न हा प्रलंबित राहिला आहे.
यासाठी भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा उपाध्यक्ष युवती आघाडी पूजा सणस, उरुळी कांचन शहर अध्यक्ष अमित कांचन, युवा मोर्चा सचिव गणेश घाडगे, उरुळी कांचन महाविद्यालयीन विद्यार्थीनी आघाडी अध्यक्ष साक्षी ढवळे, पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय विद्यार्थिनी आघाडी अध्यक्ष मानसी भुजबळ यांनी विद्यापीठामध्ये जाऊन पाठपूरावा करुन प्रश्न मार्गी लावला आहे.
याबाबत बोलताना उरुळी कांचन भाजपचे शहर अध्यक्ष अमित कांचन म्हणाले कि, वाणिज्य शाखेतील एका विद्यार्थिनीचा विषयासंदर्भातील प्रश्न प्रलंबित राहिला आहे. तो प्रश्नही पुढील दोन दिवसात सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच भारतीय जनता पक्ष हा विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव तप्तर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणतीही समस्या असल्यास भाजपाशी संपर्क करावा. असे आवाहन कांचन यांनी यावेळी केले आहे.