दिनेश सोनवणे
दौंड : येथील शिक्षक नामदेव दत्तात्रय खडके यांना जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे
पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी व पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2022 हा दौंड तालुक्यातील उत्कर्ष शिक्षण संस्था कुसेगाव संचलित श्री फिरंगाईमाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील कुरकुंभ चे विद्यार्थी प्रिय, आदर्श व उपक्रमशील शिक्षक नामदेव दत्तात्रय खडके यांना देण्यात आला आहे.
भोर येथे शैक्षणिक क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल भोर- वेल्हा- मुळशी चे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते व टी.डी.एफ.चे कार्याध्यक्ष जी. के. थोरात, राज्य विश्वस्त के. एस. ढोमसे, वसंतराव ताकवले, मुरलीधर मांजरे यांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन पुरस्काराने गौरविण्यात आले. नामदेव खडके हे गेली ३० वर्षे
गणिताचे अध्यापन करत आहेत. आता पर्यंत त्यांनी अनेक प्रशिक्षणामध्ये मास्टर ट्रेनर म्हणून काम केलेले आहे. गणिताबरोबरच त्यांनी वैयक्तिक खेळ, व्हॉलीबॉल, फुटबॉल यासारख्या खेळांचे राज्यस्तरीय प्राविण्य प्राप्त अनेक खेळाडू घडविले आहेत.
अनेक विद्यार्थ्यांना क्रीडा ग्रेस गुणांचा दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत फायदा झाला आहे. त्यामुळे ते क्रीडा शिक्षक म्हणून ओळखले जातात.
शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची पावती म्हणून नामदेव खडके यांना सामाजिक व शैक्षणिक संघटनाकडून अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत नामदेव खडके यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२२ प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.