Royal Enfield : मुंबई: रॉयल एनफिल्ड या कंपनीच्या बुलेट अनेक प्रकारे खास आहेत. आता ती आणखई चर्चेत आली आहे. गेल्या महिन्याच्या विक्रीचा चार्ट पाहिला, तर रॉयल एनफिल्डने 30 दिवसांत 75 हजारांहून अधिक बाईक्स विकल्या आहेत. ज्यात वार्षिक 14 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
हंटर 350 च्या विक्रीत घट
या वर्षी लाँच केलेल्या नवीन बुलेट 350 च्या विक्रीत वार्षिक 41 टक्के वाढ झाली आहे. तर हंटर 350 च्या विक्रीत घट झाली आहे. 650 ट्विन्सच्या वार्षिक विक्रीत सुमारे 66 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावरून असे दिसून येते की लोक रॉयल एनफिल्डच्या 650 सीसी बाईक्स पसंत करत आहेत. ही बाईक उत्पादनं 300 सीसी पेक्षा जास्त पॉवरफुल बाईक सेगमेंटमध्ये उच्च दर्जाची आहे. यामुळेच ही स्थानिक कंपनी विक्री चार्टमध्येही चांगली कामगिरी करत आहे.
गेल्या महिन्यात टॉप 3 बाईकची विक्री कशी होती?
रॉयल एनफिल्डची सर्वाधिक विक्री होणारी बाईक क्लासिक 350 गेल्या महिन्यात 30,264 लोकांनी ही खरेदी केली आहे. क्लासिक 350 ची विक्री दरवर्षी 13 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, गेल्या महिन्यात मासिक विक्रीत 5 टक्क्यांची घट दिसून आली. दुसरी सर्वाधिक विक्री होणारी बाईक बुलेट 350 जी 17,450 लोकांनी खरेदी केली. नवीन बुलेट कटीच्या विक्रीत वार्षिक 41 टक्के आणि मासिक 22 टक्के वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ हंटर 350, ज्याला 14176 ग्राहक मिळाले आणि हे मासिक 20 टक्के आणि वार्षिक 9 टक्क्यांच्या घसरणीसह आहे.