Share Market News : नवी दिल्ली : शेअर बाजारात गुंतवणूक केल्याने चांगला परतावा मिळतो. हे पाहता गुंतवणूकदार शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास आता तयार होऊ लागले आहेत. त्यात आता टाटा समूहातील TCS या कंपनीचे शेअर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला आनंद साजरा करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. तुम्हाला या कंपनीचे शेअर चांगल्या दरात विकण्याची आयती संधी मिळाली आहे.
टाटा समूहातील TCS या कंपनीने स्वतःच हे शेअर खरेदी करण्याच्या तयारीत आहे. म्हणजे कंपनी शेअर बायबॅक करण्याच्या तयारीत आहे. 17,000 कोटी रुपयांचे शेअर खरेदी करण्याची योजना कंपनीने तयार केली आहे. कंपनी या बायबॅकसाठी 25 नोव्हेंबर ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. याविषयीची माहिती कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिली. बायबॅकमध्ये कंपनी खुल्या बाजारातून शेअरधारकांकडून स्वतःचेच शेअर खरेदी करते. या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक 3,680 रुपये आहे. तर 52 आठवड्यातील निच्चांक 3,070 रुपये आहे बीएसईवर कंपनीचे बाजार भांडवल 12,43,821 कोटी रुपये होते. बायबॅकची रेकॉर्ड डेटजवळ येताच टीसीएसच्या शेअरमध्ये तेजीचे सत्र दिसून आले.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) 2,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना बदलीच्या क्षण नोटिसा पाठवल्या आहेत. या कर्मचाऱ्यांना 15 दिवसांच्या आत नियुक्त ठिकाणी रुजू भावात होण्यास सांगण्यात आले आहे. सुमारे महिनाभरापूर्वी कंपनीने आपल्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवस कार्यालयातून काम करणे बंधनकारक केले होते. कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या काही ई-मेलनुसार, त्यांना ठरलेल्या ठिकाणी जाण्यासाठी सुमारे दोन ही आठवड्यांची नोटीस देण्यात आली.