नवी दिल्ली : आयकर विभागाने महत्त्वपूर्ण माहिती दिली असून, 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी ई-फायलिंग पोर्टलवर 30.75 लाखांहून अधिक लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यात आले आहेत, असे सांगण्यात आले. यामध्ये फॉर्म 29 बी, 29 सी, 10 सीसीबी आदींमधील इतर लेखापरीक्षण अहवालांव्यतिरिक्त मूल्यांकन वर्ष 24 साठी दाखल केलेल्या अंदाजे 29.5 लाख कर लेखापरीक्षण अहवालांचा समावेश आहे.
आयकर विभागाकडून करदात्यांच्या सोयीसाठी आउटरीच कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर चालवले गेले आहेत. या आउटरीच कार्यक्रमांतर्गत करदात्यांना ई-मेल, एएमएस, सोशल मीडियावर 55.4 लाख मेसेज पाठवण्यात आले आहेत. आयकर विभागाकडून पोर्टलवर टॅक्स ऑडिट रिपोर्ट वेळेत सादर करण्यासाठी जनजागृती मेसेजही देण्यात आला. यासाठी सर्व व्हिडिओ इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवरही अपलोड करण्यात आले होते.
55.4 लाख मेसेज फॉरवर्ड
जे लोक एका आर्थिक वर्षात व्यवसायातून 1 कोटी रुपये आणि व्यवसायातून 50 लाख रुपये कमावतात, त्यांना आयकर लेखापरीक्षण अहवाल सादर करावा लागतो. जर कोणी असे करण्यात अपयशी ठरल्यास त्याच्या विक्री/ उलाढाली / एकूण पावतीच्या 0.50 टक्के आणि 1.5 लाख यापैकी जे कमी असेल ते दंड म्हणून जमा करावे लागेल. या संदर्भात आयकर विभागाने 55.4 लाख ग्राहकांना मेसेज पाठविले आहे.