मुंबई : शेअर बाजारात चढउतार कायम आहे. प्रमुख 30 शेअर बेंचमार्क निर्देशांक 255.83 अंकांच्या वाढीसह 85,169.87 वर बंद झाला. त्याचवेळी, 50 शेअर्सचा NSE निफ्टी निर्देशांक 63.75 अंकांनी वाढून 26,004.15 वर बंद झाला. बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 3 पैशांच्या वाढीसह 80.60 रुपयांवर बंद झाला.
बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चढ-उतारासह व्यवहार दिसून आले. सेन्सेक्स आणि निफ्टीचे व्यवहार लाल चिन्हावर सुरू झाले. मात्र, लवकरच ते हिरव्या चिन्हावर परतले. वरच्या पातळीवर बाजारात पुन्हा विक्री झाली. त्यानंतर बहुतांश वेळा बाजारात लाल चिन्हावरच व्यवहार होताना दिसले. शेवटच्या सत्रापूर्वी, बेंचमार्क निर्देशांकांनी मोठी उडी घेतली आणि सेन्सेक्स-निफ्टी नवीन उच्चांकांवर बंद करण्यात यशस्वी झाले.
सेन्सेक्स-निफ्टीमध्ये नवीन उच्चांक असूनही बीएसईचे मार्केट कॅप घटल्याचे पाहिला मिळाले. शेअर बाजाराने विक्रमी उच्चांक गाठला असूनही, सेन्सेक्सवर सूचीबद्ध एकूण कंपन्यांचे मार्केट कॅप 475.24 लाख कोटी रुपयांनी घसरून 83,219 कोटी रुपयांवर आले आहे.
पॉवर ग्रिड, ॲक्सिस बँक शेअर्स वधारले
सेन्सेक्स समभागांमध्ये पॉवर ग्रिड, ॲक्सिस बँक, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स आणि टाटा स्टील हे शेअर्स सर्वाधिक वधारले. यामध्ये 4 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.