मुंबई : गेल्या आठवड्यात आयटी कंपन्यांच्या निकालाने निराशा केली असली तरी, यूएस फेडरल रिझर्व्हचे मवाळ धोरण, चीनमध्ये प्रोत्साहनाच्या घोषणेची अपेक्षा आणि अमेरिकेतील नोकऱ्यांशी संबंधित चांगला डेटा यामुळे बाजारातील घसरणीला ब्रेक लागला.
टेक्नोग्रीन सोल्युशन्स या शेअरने गेल्या 5 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना 51.38 टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 11.64 टक्क्यांच्या वाढीसह बीएसईवर 189 रुपयांवर बंद झाले. सल्लागार सेवा देणाऱ्या या कंपनीचे बाजार भांडवल 140.60 कोटी आहे. गेल्या 5 दिवसात आपल्या गुंतवणूकदारांना 59.53 टक्क्यांचा मजबूत परतावा दिला. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स बीएसईवर 9.54 रुपयांवर बंद झाले.
एन. के. इंडस्ट्रीज ही कंपनी गेल्या आठवड्यातील सर्वाधिक परतावा देणारा शेअर ठरला आहे. गेल्या 5 दिवसांत त्याच्या शेअर्समध्ये 82.66 टक्क्यांची बंपर वाढ झाली आहे. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 9.97 टक्क्यांच्या वाढीसह एनएसईवर 70.60 रुपयांवर बंद झाले. तिरुपती सर्जन या शेअरने गेल्या 5 दिवसात आपल्या गुंतवणूकदारांना 73.82 टक्क्यांचा चांगला परतावा दिला आहे. सध्या कंपनीचे शेअर्स गेल्या 5 वर्षांच्या उच्च पातळीवर व्यवहार करत आहेत.