नवी दिल्ली : बँकिंग नियमांचे पालन न करणाऱ्या बँकांना भारतीय रिझर्व्ह बँकेकडून दंड ठोठावला जाण्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यात आता पुन्हा एकदा आरबीआयने काही वित्त संस्थांना दंड ठोठावला आहे. पेमेंट सिस्टम ऑपरेटर (PSOs), Visa Worldwide, Ola Financial Services आणि Manappuram Finance ला दंड ठोठावला आहे.
आरबीआयने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले की, मणप्पुरम फायनान्स लिमिटेडवर 2016 च्या KYC मार्गदर्शक तत्त्वांचे काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल 41.50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय ओला फायनान्स सर्व्हिसेसला 33.40 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
तसेच प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स आणि कार्डलेस व्यवहारांशी संबंधित काही तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल ओला फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि व्हिसा वर्ल्डवाइड या दोन पेमेंट सिस्टम ऑपरेटर (पीएसओ) वर दंडाचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. या दोन्ही PSO ने प्रीपेड पेमेंट साधनांच्या वापरासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याची नोंद करण्यात आली आहे.