नवी दिल्ली: दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यापासून आरबीआयकडून आता एक हजार रुपयांच्या नोटा बाजारात आणली जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक हजार रुपयांची नोट पुन्हा बाजारात आणणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. परंतु सध्या आरबीआयकडून एक हजार रुपयांची नोट चलनात आणण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
आरबीआय एक हजार रुपयांच्या नोटा जारी करणार नाही. चलनातून दोन हजार रुपयांची नोट काढून घेतल्यानंतर रिझर्व्ह बँकेचा एक हजार रुपयांची नोट जारी करण्याचा कोणताही विचार नाही, असंही आरबीआयनं सांगितले आहे. अलीकडेच रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून निर्णय घेतला होता.