नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने भारतातील खाजगी क्षेत्रातील अग्रगण्य बँक एचडीएफसी लिमिटेड आणि बँक ऑफ अमेरिकेला प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे.
आरबीआयच्या म्हणण्यानुसार, दोन्ही बँका फेमा कायद्याचे योग्यप्रकारे पालन करत नाहीत. तीन सहकारी बँकाही आरबीआयच्या रडारवर आल्या आहेत. यामध्ये गुजरातच्या भ्रंगधा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बँकेवर ठेवींशी संबंधित नियमांचे योग्य पालन न केल्याचा आरोप आहे.
याशिवाय अहमदाबादच्या मंडल नागरिक सहकारी बँकेला दीड लाख रुपये आणि बिहारच्या पाटलीपुत्र सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँकेला दीड लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आरबीआयने एचडीएफसी लिमिटेड आणि बँक ऑफ अमेरिकेला प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, या बँकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.