नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्यांनी अडीच वर्षांनंतर टॅरिफच्या दरात 20 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. यामुळे आता कंपन्यांचा करपूर्व नफा 20-22 टक्क्यांनी वाढू शकतो. यासह, 2024-25 मध्ये या कंपन्यांची प्रति ग्राहक कमाई (ARPU) 15 टक्क्यांनी वाढून 220 रुपये होऊ शकते, असाही अंदाज आता व्यक्त केला जात आहे.
2022-23 मध्ये ते सरासरी 191 रुपये होते. एआरपीयूमध्ये प्रत्येक रुपयाच्या वाढीमुळे दूरसंचार उद्योगाचा करपूर्व नफा 1000 कोटी रुपयांनी वाढू शकतो. ARPU मध्ये 15 टक्क्यांनी वाढ केल्यास तंत्रज्ञान अपग्रेड करण्यात आणि नेटवर्कचा विस्तार करण्यास मदत होईल. याशिवाय कंपन्यांचे कर्जही कमी होईल, असेही सांगण्यात आले आहे.
त्यातच 2024-25 या वर्षात हे दर 15 टक्क्यांनी वाढून 220 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. यापूर्वी म्हणजे 2022-23 मध्ये ते सरासरी 191 रुपये होते. दूरसंचार कंपन्यांनी वाढवलेले हे दर आता कंपन्यांसाठीच फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे येत्या दिवसांत या दूरसंचार कंपन्यांची आर्थिक स्थिती चांगलीच सुधारणार असल्याचे सध्याच्या अंदाजावरून दिसत आहे.